Monday , March 9 2026
Breaking News

निपाणीतील पर्यावरणप्रेमी शिक्षक नामदेव चौगुले कर्नाटक राज्य पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बेंगळुरू येथील अखिल कर्नाटक सांस्कृतिक परिषदतर्फे आयोजित साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमात
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे निपाणी येथील पर्यावरणप्रेमी शिक्षक‌ नामदेवराव चौगुले यांना कर्नाटक राज्य पुरस्कार पर्यावरणप्रेमी शिक्षक पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.ज्ञानयोगी परमपूज्य श्री. सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या ज्ञानदासोहाच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या गुरु नमन नुडी नमन या कार्यक्रमात राज्यस्तरीय उत्सवाच्या निमित्तानेकुमार गंधर्व भवनात
देशभरातील साहित्यिक, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला. पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड आणि समाज जागृतीसाठी गेली २५ वर्षे सातत्याने कार्य करणारे शिक्षक नामदेवराव चौगुले यांना त्यांच्या पर्यावरणविषयक कार्याची दखल घेऊन कर्नाटक राज्यातील हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नामदेवराव चौगुले हे ‘भूमी वात्सल्य सोशल फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष असून प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे
यांच्या ‘सह्याद्री देवराई’ या पर्यावरण चळवळीचे स्वयंसेवक म्हणूनही कार्यरत आहेत. पर्यावरण संवर्धन, वृक्षसंवर्धन आणि समाजजागृतीसाठी त्यांनी सातत्याने अनेक उपक्रम राबवले आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन एम. शिवप्रसाद गौडा (अध्यक्ष, अखिल कर्नाटक सांस्कृतिक परिषद, बेंगळुरू) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी राज्याध्यक्ष मनोहर के. नायक,आर. महेश (कार्याध्यक्ष) *श्रीनिवास कागे (कार्यक्रम संयोजक) यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
नामदेव चौगुले यांचेसह डॉ.मयुरी जाधव, प्रकाश कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात नामदेव चौगुले यांनी एक प्रेरणादायी उपक्रम राबवत उपस्थित सर्व मान्यवर व पुरस्कार सन्मानार्थीचा गुलाबाची रोपे भेट देऊन सत्कार केला. पारंपरिक पुष्पगुच्छाऐवजी रोपे देण्याच्या या अभिनव उपक्रमामुळे कार्यक्रमाला पर्यावरणपूरक स्वरूप प्राप्त झाले आणि उपस्थितांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड व संवर्धनाची गरज अधोरेखित करत समाजाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, असे मत व्यक्त केले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ सन्मानाचा सोहळा न राहता पर्यावरण जागृतीचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला.

About Belgaum Varta

Check Also

‘फ्रिज’च्या जमान्यातही मातीच्या माठांना मागणी कायम

Spread the love  निपाणी बाजारपेठेत अनेक ठिकाणी विक्री; चाव्यासह नानाविध प्रकारात उपलब्ध निपाणी (वार्ता) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *