निपाणी (वार्ता) : बोरगाव येथीलटेक्सटाईल पार्क औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेले सर्व उद्योगधंदे हे कर्नाटक राज्यातील व्यावसायिकांनाच मालकी तत्वावर दिले आहेत. ३९ पैकी २० उद्योजकांना शासकीय सवलतीचा लाभही मिळाला आहे. हेउद्योजक कर्नाटक राज्यातीलच आहेत. पण काही नागरिकांनी हा प्रकल्प, इतर राज्यातील उद्योजकांना दिल्याचे अफवा पसरण्याचा प्रयत्न करत आहेत. शक्य असेल तर आरोप सिद्ध करूनच बोला, असा इशारा बोरगाव टेक्सटाईल पार्क, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष, हालशुगरचे संचालक, नगरसेवक शरद जंगटे यांनी दिला
बोरगाव औद्योगिक वसाहतीमध्ये मंगळवारी (ता.१०) आयोजित पत्रकार बोलत ते होते.
शरद जंगटे म्हणाले, सन २०१३ साली बोरगाव येथील ७५ एकर गायरान जमिनीमध्ये औद्योगिक प्रकल्पास मंजुरी मिळाली. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी आपण कष्ट करून सन २०१८ पासून या औद्योगिक वसाहतीला उर्जितावस्था आणली. शहरातील काही लोकांनी बोरगाव औद्योगिक प्रकल्पिमध्ये सरकारने आद्योगिक कारणासाठी दिलेले शासकीय प्लॉट हे उद्योगधंद्यांसाठी इतर राज्यातील महाराष्ट्र, गुजरातमधील व्यवसायिकांना दिल्याचा बिन बुडाचा आरोप केला आहे. याशिवाय महाराष्ट्र, गुजरात मधील लोकांना कर्नाटक शासनाकडून मिळालेल्या सबसिडी योजनेचा लाभ दिल्याचे भासवत आहेत. हे पूर्णतः खोटे असून यावर कोणीही विश्वास ठेवू नये. शिवाय या सगळ्याची शासकीय चौकशी व्हावी.
चुकीच्या अफवा पसरवण्यापेक्षा आवश्यक कागदपत्रास उद्योगपती संजय घोडावत यांनी बोरगावमध्ये “स्टार उद्योग समूह” नावाचा एक मोठा उद्योग प्रकल्प उभा करावा व शहरातील बेरोजगारांना काम उपलब्ध करून देण्याचा निश्चय केला होता. शिवाय स्व-खर्चातून शहराचा सर्वांगीण विकास करून बोरगाव शहरास एक “हायटेक स्मार्ट सिटी” बनवण्याचा मानस केला असतात्या प्रकल्पालाना सुद्धा याच लोकांनी अडथळा आणून, वेळप्रसंगी धमकावून त्यांनाही उधळवून लावले. त्याचे विपरीत परिणाम शहरवासीय भोगत असल्याची खंत आहे. अनेक लोक मद्यधुंद अवस्थेत रात्री अपरात्री टेक्सटाईल पार्क परिसरातील कारखान्यावर जाऊन तोडफोड करणे, धमकाविणे यासारकी कृत्ये करत आहेत.याची पोलिसांना कल्पना दिली असता,यावर कोणतीच कारवाई होत नाही. त्यामुळे यामागील गौड बंगाल काय? असा सवाल ही नगरसेवक जंगटे यांनी व्यक्त केला आहे.
बैठकीस बी. के. महाजन, अजित तेरदाळे, जितू पाटील, सचिन कोळी, शंकर गुरव, भरत कांबळे, किसन गोसावी, अमोल पाटील, सागर आलासे, राजु लटलटे, महावीर पाटील, भरत पाटील, संजू महाजन, फिरोज अफराज, भूपाल महाजन, राजू कुंभार यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta