Tuesday , August 25 2026
Breaking News

लेखक, निर्माते, दिग्दर्शक श्री. दिग्पाल लांजेकर यांचे “इथे ओशाळला मृत्यू”साठी बेळगावकरांना आवाहन

Spread the love

 

बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची धगधगती शौर्यगाथा दर्शविणारे प्रा. वसंत कानेटकर लिखित शिवगणेश प्रोडक्शन निर्मित “इथे ओशाळला मृत्यू” या ऐतिहासिक नाटकाचे दोन प्रयोग महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आले आहेत. या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख भेमिकेत गणेश ठाकूर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत डॉ.सोनाली लेले तर औरंगजेबाच्या भूमिकेत कृष्णा देसाई हे आहेत.
या सर्व कलाकारांना शुभेच्छा देत हे अजरामर नाटक सर्व बेळगावकरांनी आवर्जून पहावे असे आवाहन प्रसिद्ध मराठी चित्रपट लेखक, दिग्दर्शक, निर्माते श्री दिग्पाल लांजेकर (पावनखिंड, फत्तेशिकस्त, शेरशिवराय, रणपती शिवराय, सुभेदार,फर्जंद) यांनी सदिच्छापर व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
सदर प्रयोगातून मिळणारा नफा हा युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमासाठी उपयोगात आणला जाणार आहे.
रविवार दिनांक १५ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.०० आणि सायंकाळी ७.०० असे दोन प्रयोग होणार आहेत.
या नाटकाचे प्रायोजक आहेत प्रसाद मेडिकल मॉल आणि आर.एम. चौगुले आणि असोसिएट
देणगी प्रवेशिकांसाठी संपर्क
७०१९६६८०२५, ८७६२७६४५९३, ८९०४१९७९६९

About Belgaum Varta

Check Also

येळ्ळूर रस्त्यावरील कचरा तातडीने हटवा; समाज सारथी संघटनेचे मनपा आयुक्तांना निवेदन

Spread the love  बेळगाव : येळ्ळूर रस्त्यावरील केएलई रुग्णालयाजवळ मोठ्या प्रमाणात कचरा टाकून त्याचे वर्गीकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *