Wednesday , March 11 2026
Breaking News

बोरगाव येथील अरण्यसिद्धेश्वर यात्रेनिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांची भेट

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरण्यसिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ झाला असून त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त सहकाररत्न उत्तम पाटील यांनी मंदिरास भेट देऊन अरण्यसिद्धेश्वराचे दर्शन व आशीर्वाद घेतला. यावेळी यात्रा कमिटीतर्फे उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
उत्तम पाटील यांनी सत्कारबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन गावाची संस्कृती, परंपरा आणि एकोप्याची भावना टिकवून ठेवण्यात अशा धार्मिक यात्रांचे मोठे योगदान आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा व बंधुभाव वाढविण्याचे काम या यात्रांमुळे घडत असते. यापुढील काळातही अशा यात्रा जत्रा आणि उत्सवासाठी आपण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी अजित सावर्डे, शिरखा फिरगणनावर, संजय ऐददमाळे, सुशांत सावर्डे, रावसाहेब सावर्डे, राजू सावर्डे, राजू मगदूम यांच्यासह यात्रा कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, भाविक व ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कांद्याला सोसवेना गोणी दराचा ‘भार’

Spread the love  शेतकऱ्यांच्या घामाला कवडीमोल भावः प्रतिशेकडा १ हजाराचा दर निपाणी (वार्ता) : बंगळूर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *