निपाणी शहरात थाटली दुकाने; रमजानच्या अंतिम पर्वाला प्रारंभ
निपाणी (वार्ता) : मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यातील अंतिम परर्वाला प्रारंभ झाला आहे. शनिवारी (ता.२१) निपाणी व परिसरात रमजान ईद साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इफ्तार आणि ईदसाठी विक्रेत्यांनी सुकामेव्याची दुकाने थाटली आहेत. यंदा दरात वाढ झाल्याचे नागरीकांनी सध्या तरी खरेदीस हात आखडता घेतला असून पुढील दोन-तीन दिवसानंतर नागरिकांची खरेदीसाठी बाजारात गर्दी होईल, असा विश्वास विक्रेत्यांनी व्यक्त केला.
रमजान महिन्यात खजूर, काजू, बदाम, बेदाणा, पिस्ता, अंजीर, अक्रोड आणि केशर यांसारख्या पदार्थांचा शिरकुर्मा बनवण्यासाठी वापर केला जातो. सध्या बाजारपेठेत या सर्व वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. ऐन सणासुदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसोबत सुकामेवा महागल्याने खरेदीत काटकसर करावी लागत आहे. खसखस २ हजार ७०० ते २ हजार ८०० रुपये प्रतिकिलो, तर पिस्ता १ हजार ८०० ते २ हजार रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. काजू, बदाम आणि खोबऱ्याच्या दरातही १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
——————————————————————–

‘रमजान महिन्यात उपवास सोडताना खजूर व दूध घेण्याची परंपरा असल्याने खजुराला सर्वाधिक मागणी आहे. शिवाय दोन दिवसात काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, अक्रोड, विविध प्रकारच्या बर्फी, जिलेबी, पिस्ता रोल, ड्रायफूट बर्फी, मिल्क केक, काजू कटली, खजूर रोल, मिक्स ड्रायफूट, मँगो मलाई कलकंद, अंजीर मलाई, चॉकलेट बोल, मलाई पुरी, केशर पेढा, खवा बर्फी, भी आणि खोबऱ्याच्या खरेदीला प्रारंभ होईल.’
-देवाराम चौधरी, सुकामेवा विक्रेते, निपाणी
Belgaum Varta Belgaum Varta