Monday , August 31 2026
Breaking News

आगीच्या दुर्घटनेतील नुकसानग्रस्तांना बोरगाव अरिहंत समूहातर्फे आर्थिक मदत

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बस स्थानकाजवळील चिक्कोडी रोडवरील जासूद कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या तीन व्यवसायिक गाळ्यांना शुक्रवारी (ता.१३) रात्री अकरा वाजण्याचा सुमारास अचानक शॉर्टकटने आग लागून दुर्घटना घडली. त्यामध्ये तीनही व्यवसायकांचे सुमारे पाच लाख रुपये नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती समजताच बोरगाव येथील अरिहंत उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि सहकाररत्न उत्तम पाटील यांनी शनिवारी (ता.१४) दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन त्यांना दिलासा दिला.
निपाणी-चिक्कोडी रोड येथे तौसिफ पकाली यांच्या ज्यूस दुकानाला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागून नुकसान झाले. या आगीत दुकानातील फळे, ज्यूस बनविण्याचे मशीन व इतर साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे उत्तम पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त तौसिफ पकाली यांची विचारपूस केली. त्यांना धीर देत व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी सकारात्मक आर्थिक पाठबळ दिले. यावेळी अरिहंत उद्योग समूहातर्फे आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधिलकी जपली. संकटाच्या काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी माणुसकी असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ज्ञमाजी नगरसेवक सर्फराज उर्फ शेरू बडेघर, युवा उद्योजक इम्रान मकानदार, शिरीष कमते रवी गुळगुळे, राजू नाईकवाडे, समीर सय्यद, फैयाज मकानदार, हरी जासूद, इम्रान बाडीवाले त्यांच्यासह व्यापारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेतर्फे रक्षाबंधन सण साजरा

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *