निपाणी (वार्ता) : दुचाकीवरून ताबा सुटल्याने दुभाजकाला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या वडणगे, पाडळी (ता. करवीर) येथील दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. दत्तात्रय परसू पाटील (वय ५१) असे त्याचे नाव आहे. या अपघाताची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
दत्तात्रय पाटील हे आपल्या नातेवाईकांच्या विवाह समारंभासाठी निपाणीला आले होते. विवाह आटोपून ते दुचाकीवरून गावाकडे परतत होते. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आप्पाचीवाडी फाट्यावर त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुभाजकाला धडक बसल्याने ते खाली कोसळून गंभीर जखमी झाले.
त्यांच्यावर येथील महात्मा गांधी रुग्णालयात प्राथमोपचार करून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत पत्नी ज्योती पाटील यांनी ग्रामीण पोलिसांत फिर्याद
दिली असून पुढील तपास उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta