निकु पाटील : तायक्वांदो स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये निरोगी आरोग्य असणे गरजेचे आहे. शालेय विद्यार्थ्यांनी मोबाईल व संगणक मधून बाहेर पडून शारीरिक कसरत करून निरोगी आरोग्य कमावणे हीच खरी संपत्ती आहे. तायक्वांदो सारख्या कला आत्मसात करून मुला-मुलींनी स्वसंरक्षण कला शिकणे गरजेचे आहे, असे मत दौलतराव पाटील सोशल फाउंडेशनचे संस्थापक संयोगित उर्फ निकु पाटील यांनी व्यक्त केले.
बंगळुरू येथील कर्नाटका तायक्वांदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली विफा कप तिसरी राष्ट्रीय तायक्वांदो ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये येथील सद्गुरु तायक्वांदो स्पोर्ट्स अकॅडमी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धा स्पीड किक व पूम्से अशा दोन विभागात पार पडल्या. त्यामधील गुणी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
प्रारंभी तायक्वांदोचे मुख्य प्रशिक्षक बबन निर्मले यांनी प्रास्ताविक केले.
सब ज्युनिअर विभागात रूही बोधले, रिधानसिंग मुरगुड, धनवर्षा देसाई, आस्था शहा, सम्मेद रजपूत, अवनी कुलकर्णी, सावी गुजर, तनया वाळवे, सय्यम कूपाडे यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला.
ज्युनिअर विभागात अथर्व शेळके, प्रज्वल नायक, अभय कुमार तळवार, रुचिता रजपूत, आफ्रा पठाण, शिवम ऐनापुरे, यांनी प्रथम द्वितीय क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दौलतराव सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संयोगित (नीकू) पाटील, जायंट्स ग्रुप ऑफ निपाणीचे अध्यक्ष गंगाधर मगदूम, उपाध्यक्ष आकाश मल्लाडे, जायंट्स ग्रुप ऑफ कोल्हापूरचे अध्यक्ष सुरेश घाटगे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत विश्व हिंदू परिषद बजरंग दल उपाध्यक्ष अजित पारळे, सागर श्रीखंडे, माजी सैनिक मनोहर कापसे, सीबीएसई शाळेच्या प्राचार्या शर्मिष्ठा रॉय व मल्लिकार्जुन गुंजाळ यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार पार पडला. सुरेश घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास गणेश हुळकांती, प्रथमेश भोसले, आदित्य सोलापूर, ओमकार अलकनुरे, अनुष्का चव्हाण, देवराज मल्हाडे, शर्वरी फुटाणे उपस्थित होते. विजय नाईक यांनी आभार मानले.