Wednesday , March 18 2026
Breaking News

बेंगलोर येथील निषेध सभेच्या पार्श्वभूमीवर बेळगावात शुक्रवारी बैठक

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अंतर्गत आरक्षण रोस्टर वाटपाला विरोध आणि जुन्या आरक्षण नियमानुसार त्वरित भरतीच्या मागणीसाठी भोवी समाज, बंजारा, कोरम, चालवाडी, चर्मकार यांच्यासह अल्पसंख्याक जातीच्या विषयावर चर्चा करण्यासह निषेध मेळावा मंगळवारी (ता.२४) मार्च रोजी सकाळी दहा वाजता बेंगळूर येथील फ्रीडम पार्कमध्ये आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या सभेबाबत बेळगाव जिल्ह्यातील भोवी वडर समाजाच्या नेत्यांची शुक्रवारी (ता. २०) सकाळी दहा वाजता बेळगाव शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील भोवी वडर समाजाच्या सभेला नेते मंडळीसह कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याच्या आवाहन माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार-वडर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

सिलेंडर पुरवठा सुरळीत पण ग्राहकांची गर्दी

Spread the love  हॉटेल, धाब्यांची कसून चौकशी : कारवाईत राहणार सातत्य निपाणी (वार्ता) : घरगुती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *