Sunday , September 20 2026
Breaking News

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली दहावीच्या परीक्षा केंद्रांना भेट

Spread the love

 

बेळगाव : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची मुख्य परीक्षा आजपासून राज्यभरात सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी शहरातील विविध परीक्षा केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी परीक्षा केंद्रांवरील बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि सुरक्षिततेचा आढावा घेतला. परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश करण्यात आले असून, संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली पारदर्शकपणे पार पाडण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

विद्यार्थ्यांनी कोणत्याही दडपणाखाली न येता आत्मविश्वासाने पेपर लिहावा, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी ही परीक्षा देत असून, आजचा पहिला पेपर अत्यंत शांततेत पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *