Thursday , April 9 2026
Breaking News

बेंगळूरच्या निषेध मेळाव्यास समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे राजेंद्र वडर यांचे आवाहन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : अंतर्गत आरक्षण रोस्टर विरोध आणि जुन्या आरक्षण नियमानुसार त्वरित भरतीच्या मागणीसाठी भोवी समाज, बंजारा, कोरम, चालवाडी, चर्मकार यांच्यासह अल्पसंख्याक जातीच्या विषयावर चर्चा करण्यासह निषेध मेळावा मंगळवारी (ता.२४) बेंगळूर येथील फ्रीडम पार्कमध्ये सकाळी दहा वाजता आयोजित केला आहे. या मेळाव्याच्या सभेबाबत बेळगाव जिल्ह्यातील भोवी- वडर समाजाच्या नेते मंडळींची बेळगाव शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. या बैठकीस राज्याचे नेते रवी पुजारी, भोज येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य व ओसीसीआय डायरेक्टर आणि कर्नाटक राज्यसदस्य राजेंद्र पवार-वडर, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवडर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजेंद्र वडर यांनी, वडर, भोवी व इतर समाज वर्षानुवर्षे कष्टाची कामे करून उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांच्यासाठी शासनाच्या अनेक योजना असून त्या संबंधितापर्यंत पोहोचत नाहीत. शिवाय नोकरीमध्ये आरक्षण असतानाही त्यांना वंचित राहावे लागत आहे. याबाबत बेंगलोर येथील फ्रीडम पार्कमध्ये समाज बांधवांचा निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या न्याय हक्क मागण्या मांडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. बैठकीस के. एस. ममदापूरे, अक्षय ममदापूरे, माजी नगरसेवक दत्ता जोत्रे, विठ्ठल वडर, मोहन गाडीवड्डर, सिद्धू पात्रोट, मंजुनाथ भोवी, हनुमंत कागलकर, शटुप्पा कागलकर, अरुण वडर, राजू वडर, दगडू वडर, अक्षय वडर यांच्यासह भोवी, वडर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शिंत्रे कॉलनीतील अतिक्रमण हटण्यासाठी नागरिकांचे नगरपालिका आयुक्तांना निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी.बी. रोड वरून शिंत्रे कॉलनीत जाण्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *