Sunday , April 5 2026
Breaking News

महात्मा बसवेश्वर सौहार्द संस्थेमध्ये गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रम

Spread the love

 

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील चिक्कोडी रोडवरील महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी संस्थेतर्फे गुढीपाडवा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष सहकाररत्न डॉ. सी. बी. कुरबेट्टी व अध्यक्ष किशोर बाली यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर व सिद्धेश्वर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन झाले. संचालक राजेश पाटील यांच्याहस्ते गुढीचे पूजन झाले.
डॉ. कुरबेट्टी म्हणाले, गुढीपाडवा हा केवळ तोरणे बांधून किंवा वस्तू खरेदी करण्याचा सण नाही. तो निसर्ग आणि माणूसातील अतुट नात्याचा सोहळा आहे. संस्थेने ३१ मार्चपर्यंत ७०० कोटी ठेवींचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या प्रांगणात गुढी उभारून संकल्पसिद्धी ध्येय ठेवल्याचे सांगितले.
कार्यक्रमास संचालक डॉ. एस. आर. पाटील, श्रीकांत परमणे, सुरेश शेट्टी, प्रताप पट्टणशेट्टी, महेश बागेवाडी, अशोक लिगाडे, दिनेश पाटील, संचालिका पुष्पा कुरबेट्टी, विजया शेट्टी, सुवर्णा पट्टणशेट्टी, सीईओ एस. के. आदण्णावर, असिस्टंट सीईओ महेश शेट्टी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *