Sunday , April 5 2026
Breaking News

श्रीक्षेत्र स्तवनिधीमध्ये भक्तीमय वातावरणात ब्रह्मदेव पालखी सोहळा 

Spread the love
निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील क्षेत्रपाल ब्रह्मदेव देवाचा अमावस्या आणि पाडव्यानिमित्त पालखी सोहळा भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर निपाणी व परिसरातील भाविकांनी क्षेत्रपालाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
सकाळी क्षेत्रपालाची पूजा व अभिषेक प्रतिष्ठाचार्य अनिल कुमार कलाजे यांच्या प्रमुख उपस्थितीत म पार पडला. त्यानंतर सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत क्षेत्रपालाची आरती आणि पालखी सोहळा पार पडला. त्यानंतर भाविकांना प्रसादाचे वाटप झाले.
यावेळी कमिटीचे आर. बी. खोत, बाळासाहेब मगदूम, सुधाकर नाडगे, आशिष खोडबोळे, विलास उपाध्ये, राजेंद्र कंगळे, विकास कागे, शशिकुमार गोरवाडे, यांच्यासह कमिटीचे पदाधिकारी, सदस्य श्रावक व श्राविका उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *