
सौेदलगा : सौंदलगा येथील सरकारी मराठी मुलांच्या शाळेमध्ये जागतिक महिलादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरवातीला मान्यवरांचे शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. येथील सरकारी कन्नड शाळेच्या मुलींनी महिलादिना निमित्त राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई, शूरवीरवब्बवा, राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नमा या थोर, शुरवीर, महिलांच्या हुभेहुभ वेषभूषा सादर केलेेल्या विद्यार्थीनी कस्तुरी भानसे, श्रावणी कोगनोळे, पुजा भानसे, सानिका भानसे, ऐश्वर्या भानसे, सावित्री भानसे, मल्लवा भानसे, जयश्री हातरकी यांनी भाग घेतला होता. यानंतर अमिता करणूरकर, एल. एस. निडगुंडी यांनी मनोगत व्यक्त केले. तर एस. जी. हालसवडे, साक्षी आवळेकर विद्यार्थीनीनी गानी गायली. यावेळी डी.डी.पी.आय. यांचे कडून टी.पी.ई.ओ. शांताराम जोगळे यांच्या प्रयत्नातून क्रिडासामग्री अनुदानातून मिळालेल्या क्रिडासामग्रीचे उदघाटन एसडीएमसी अध्यक्ष शंकर कदम यांनी केले. यानंतर महिला दिनानिमित्त मारुती व्हरकट यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनीना जिलेबीचे वाटप करण्यात आले. प्रणव व्हरकट युक्रेनहून सुखरुप भारतात परतल्याबद्दल शाळेच्या सर्व एस.डी.एम.सी.अध्यक्ष, उपाध्यक्षा, सदस्य, मुख्याध्यापक धनंजय ढोबळे, शिक्षक वृंद यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले. यावेळी एसडीएमसी उपाध्यक्षा तब्बसुम मुल्ला, सदस्या उज्वला खराडे, सुनिता चव्हाण, स्वाती किरळे, सदस्य दिलीप सांगावे, सागर पोवार, दतात्रय बोरगावे, संजय पाटील, अमृत चौगुले, अरिफ मुल्ला, मिथून कांबळे, सरकारी कन्नड आणि मराठी शाळेचे सर्व शिक्षक / शिक्षीका, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी आभार शिक्षीका लता शेवाळे यांनी तर सुत्रसंचलन भगीरथी भानसे या विद्यार्थिनीने केले.
Belgaum Varta Belgaum Varta