Friday , April 17 2026
Breaking News

‘नियती’तर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण

Spread the love

बेळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण -मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहकार्याने शहरातील नियती फाऊंडेशनतर्फे आयोजित सावित्रीबाई फुले पुरस्कार -2022 वितरण, महिला दिन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा संयुक्त सोहळा आज मंगळवारी उत्साहात पार पडला.

शहरातील आयएमईआर सभागृहांमध्ये नियती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावच्या खासदार मंगला अंगडी, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, समन्वयक वाणीश्री पाटील आणि सांस्कृतीक केंद्र नागपूरचे संचालक डाॅ. दीपक खिरवाडकर व्यासपीठावर उपस्थित होते. स्वागत आणि प्रास्ताविकानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सोहळ्याचे उद्घाटन झाले.

यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी समयोचित विचार व्यक्त करून नियती फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला. सदर सोहळ्यात शिक्षक व लेखिका आशा रतनजी, दिव्यांग बॅडमिंटनपटू आरती पाटील, अंगणवाडी कार्यकर्त्या सुवर्णा पिटगी,

सामाजिक कार्यकर्ते विजया दीक्षित, मोनिका डंटिस, नाट्य कलाकार सामाजिक कार्यकर्त्या गौरी गजबर, आयर्न मॅन -न्यूट्रिशनिस्ट डॉ. हरप्रीत कौर, आशा कार्यकर्त्या संजना गावकर, सामाजिक कार्यकर्त्या लिना टोपन्नावर आणि रुपा देसाई यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार -2022 प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर जागतिक महिला दिनानिमित्त बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी निमंत्रितांसह नियती फाऊंडेशनचे सदस्य, शहरातील विविध महिला मंडळांचे पदाधिकारी -सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर काकडे यांनी केले, तर शेवटी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

Spread the love  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *