Sunday , April 5 2026
Breaking News

हुन्नरगीमधील बकऱ्यांच्या टक्करीत बेंकी बबलादी बकऱ्याने पटकावले विजेतेपद

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील बिरदेव यात्रा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह बकऱ्यांच्या टक्करीचे आयोजन करण्यात आले होते. या टक्करीमध्ये जनरल गटात ‘बेंकी बबलादी’ बकऱ्याने विजेतेपद पटकवले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकाररत्न उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
बिन दाती बकऱ्यांच्या टक्करीत हालसिद्धनाथ प्रसन्न -आप्पाचीवाडी, विठ्ठलाई प्रसन्न- नंद्याळ-सिद्धापूर वाडी, दोन दाती टक्करीत सोहेल शिरगाव- निपाणी, रॉयल ब्रदर्स मुरगुड (ए) रॉयल ब्रदर्स मुरगुड (ब) त्यांच्या बकऱ्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक पटकाविला. चार दाती बकऱ्यांच्या टक्करीत अद्विक कुंभार- बुदलमुख (रायफल ८१८१), विठ्ठलाही प्रसन्न -नंदाळ, तुफान प्रेमी- भंग्या,सहा दातीमध्ये सागर दादाप्रेमी- कागल अद्विक कुंभार- बुदलमुख (रायफल ८१८१), टारगेट किंग बादशाह,
जनरल गटात बेंकी बाबालादी- काळी, रॉयल ब्रदर्स -अगत्य, आणि वाशीखान प्रसन्न -अक्कोळ यांच्या बकऱ्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांकाची बक्षिसे मिळवली. सर्व विजेत्यांना सहकाररत्न उत्तम पाटील व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.
बिरदेव यात्रा कमिटीतर्फे उत्तम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम पाटील यांनी, सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून पारंपरिक कार्यक्रम आणि शर्यती ग्रामीण संस्कृतीची ओळख जपणारे आहेत. युवकांनीही या परंपरा जपून पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष महांतेश पाटील, अमर स्वामी, दादासाहेब किल्लेदार, आशिष खोत, अण्णाप्पा गोरडे, बाळू बरगाले, पिंटू जमादार, अरिहंत बँकेच्या हुन्नरगी शाखेचे संचालक, कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *