Sunday , April 5 2026
Breaking News

बोरगावमधील मीनाक्षी रावसाहेब पाटील ‘सर्वोत्तम श्राविका’ पुरस्काराने सन्मानित

Spread the love

 

नवी दिल्लीत प्रज्ञसागर महाराजांच्या हस्ते सन्मान; बोरगावच्या शिरपेचा मानाचा तुरा

निपाणी (वार्ता) : भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासभा नवी दिल्ली यांच्या तर्फे देण्यात येणाऱ्या राष्ट्र पातळीवरील सर्वोत्कृष्ट पुरस्कार ‘सर्वोत्तम श्राविका’ म्हणून धर्मनगरी बोरगाव येथील ज्येष्ठ समाजसेविका, वितराग महिला मंडळाच्या अध्यक्षा मीनाक्षी रावसाहेब पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रसंत प्रज्ञसागर मुनी महाराज यांच्या अमृत हस्ते मीनाक्षी पाटील यांना हा पुरस्कार मिळाल्याने बोरगाव शहराच्या शिरपेचात व जैन समाजात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दिवंगत रावसाहेब पाटील कुटुंबीय जैन धर्माच्या प्रगतीसाठी प्रामाणिक कार्य केले आहे. दादांनी दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सोबतच मीनाक्षी पाटील देखील वीर महिला मंडळ व वीतराग महिला मंडळ मार्फत समाजातील महिलांना एकत्रित करून त्यांना जागृत करण्याचे कार्य केले. महिलांच्या अडीअडचण महिलांवरील शोषण, महिला समस्यायाबाबत माहिती मिळवून त्या समस्या मिटविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. याशिवाय मुनी महाराजांचे आचार विचार समाजापर्यंत पोहोचवून सत्य अहिंसा, त्याग, सेवा, समर्पण याबाबत समाजात जागृती केली. धार्मिक कार्यात अग्रेसर राहून यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मीनाक्षी पाटील नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत वर्षीय दिगंबर जैन महिला महासंघ नवी दिल्ली यांनी आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून बोलवून त्यांना मुनी महाराजांच्या हस्ते सर्वोत्तम श्राविका म्हणून सन्मानित केले.
कार्यक्रमास स्वस्तिश्री धवलकीर्ती भट्टारक महास्वामीजी, स्वस्ति श्री भट्टाकलंक भट्टारक महास्वामीजी, स्वस्ति श्री सिद्धांतकीर्ती भट्टारक महास्वामीजी, स्वस्ति श्री अभिनव अरिहंतकीर्ती भट्टारक महास्वामीजी, भारत सरकारच्या राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजयाताई रहाटकर, उद्योजिका शोभाताई धरीवाल, भारत वर्षीय दिगंबर जैन महिला संघाच्या राष्ट्रीय अध्यक्ष एम. के. सरिता जैन, दिपाली पाटील, धनश्री पाटील, अरिहंत संस्थेचे सीईओ अशोक बंकापुरे, युवराज पाटील उपस्थित होते. मीनाक्षी पाटील यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

सिद्धार्थ ढोणे महाराजांच्या भाकणूकीने बेनाडी बिरदेव यात्रेची उत्साहात सांगता

Spread the love  निपाणी (वार्ता) : बेनाडी येथे बिरदेव देवस्थान कमिटीतर्फे आयोजित बिरदेव यात्रेची सांगता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *