दिवसभर भाविकांची गर्दी; धार्मिक कार्यक्रमाचे महाप्रसादाचे वाटप
निपाणी : शहर आणि उपनगरात स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सलग दोन दिवस येथील आंदोलन नगरातील स्वामी समर्थ मंदिर आणि राघवाचार्य गल्लीतील स्वामी समर्थ मठ केंद्र मध्ये स्वामी समर्थांचा जयघोष झाला. शिवाय दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
शहराबाहेरील आंदोलननगरात स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिन सोहळ्यानिमित्त पारायण सोहळा, उपनगरातून स्वामींचा पालखी व शोभायात्रा सोहळा सवाद्याच्या गजरात पार पडला. अवधूत सामानगडकर यांच्या पौराहित्याखाली पुजारी सुरेश संकपाळ यांच्या उपस्थितीत मान्यवर आणि भाविकांच्या हस्तेअभिषेक व महापूजा पार पडली. महाआरती झाल्यानंतर भाविकांसाठी मंदिर परिसरात महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सुमारे १० हजार भाविकांनी लाभ घेतला.संत गजाननमहाराज प्रबोधन प्र-भजन संगीत दिलीप सुतार व सहकारी (इचलकरंजी) यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी जन्मकाळ झाल्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर स्वामी सेवेकरी यांच्या स्वामीमय भक्तीसंगीताच्या कार्यक्रमा आणि आरती आरती करून स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट व भक्त मंडळ तसेच नागरिकांनी परिश्रम घेतले.
राघवाचार्य गल्ली येथील स्वामी समर्थ मठ केंद्रातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वामी सारामृत महानैवैद्य, त्यानंतर सकाळी मूर्ती व पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही पालखी मिरवणूक स्वामी समर्थ मठ केंद्र, तेली गल्ली महालक्ष्मी मंदिर, महात्मा गांधी चौक, महादेव मंदिर महादेव गल्ली, कोठीवाले कॉर्नर, कित्तूर राणी चन्नम्मा चौक, जुना पी. बी. रोड, नगरपालिका, जुना मोटर स्टॅन्ड, छत्रपती शिवाजी चौक, कामगार चौक, जिजामाता चौक, प्रभात टॉकीजमार्गे स्वामी समर्थ मठ केंद्र येथे परत आली. सकाळी पारायण सोहळा,
जन्मकाळ, अभिषेक झाल्यावर वाद्यांच्या गजरात भाविकांच्या उपस्थितीत मिरवणूक पार पडली. दुपारी महाप्रसाद वाटप झाले. यावेळी स्वामी समर्थ मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta