
निपाणी (वार्ता) : येथील शिव बसव कॉलनी येथे महिला दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. नगरसेवक शेरू बडेघर यांनी, समाजाने मुलगा, मुलगी असा भेद न करता दोघांकडे समान नजरेने पाहिले पाहिजे. जास्तीत जास्त महिलांनी मोठ मोठ्या पदावर जबाबदारी पार पाडली आहे. स्त्री कुठल्याही क्षेत्रात तिला दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडू शकते. पण तिला समाजातून प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
यावेळी वैशाली खोत, परवीन नवाब, कमल जगताप, जोत्स्ना पाटील, विणा पोटे, रोहिनी लंबे, माधुरी लंबे, माजी सभापती नाज मुजावर, पिंकी खेत्रे, मीना हुल्ले, गौरी हेगडे, जयश्री दावणे, सरोजा वराळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta