निपाणी (वार्ता) : निपाणी शहरात गेल्या नऊ दिवसापासून रामनवमी सोहळ्यानिमित्त विविध येथील बेळगाव नाक्यावरील श्रीराम मंदिरासह इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शहर आणि उपनगरात चैतन्याचे वातावरण पसरले होते. या रामनवमी उत्सवाची पालखी सोहळ्याने शुक्रवारी (ता.२७) सांगता करण्यात आली.
सांगता सोहळा निमित्त येथील श्रीराम मंदिरात सकाळी मान्यवरासह भाविकांच्या उपस्थितीतआरती करण्यात आली. त्यानंतर श्रीराम मंदिरापासून सवाद्य पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. येथून पालखी जुना पी.बी. रोड मंगळवार पेठ, येथील हनुमान मंदिरात आली. तेथेच भाविकांनी राम रक्षा स्तोत्र पठण केल्यानंतर पुन्हा पालखी जुन्या पी. बी. रोड मार्गे श्रीराम मंदिर नेण्यात आली. पालखी सोहळ्यात इस्कॉन भजनी मंडळांनी प्रामुख्याने सहभाग घेतला होता. या पालखी सोहळ्यास श्री राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आनंद सोलापूरकर, निवेदिता सोलापूरकर, अमोल रजपूत, भालचंद्र कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, प्रणव मानवी, विजय टवळे गीता पाटील, ललिता घस्ते, भावना कुलकर्णी, मंगल माने, वसुधा कुलकर्णी सागर कांबळे, सुरज कांबळे, सतीश घोडके, वर्षा नंदर्गी, प्रतिभा दिवाण, बाबासाहेब तोडकर, आनंदा चौगुले, संजय नंदर्गी, राजू ननदीकर यांच्यासह भाविक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta