निपाणी (वार्ता) : भीमापूरवाडी येथील श्रीराम मंदिरात चैत्र शुध्द पौर्णिमा गुरुवार (ता.२ एप्रिल) पासून पासून चैत्र वद्य चतुर्थी सोमवार ता.६) अखेर अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त चार दिवस विविध कार्यक्रम होणार आहेत.
सोहळ्यात माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र पवार-वडर, गळतगा पीकेपीएसचे अध्यक्ष संजय कागे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन उद्योजक सुखदेव साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब साळुंखे यांच्या हस्ते ध्वजारोहण, खडकलाट येथील अशोक यादव, खडकलाट, ममदापूर येथील पांडुरंग हरेल, गळ्यात गा ग्रामपंचायत अध्यक्ष राजू पाटील यांच्या हस्ते विना पूजन होणार आहे. जत्राट येथील श्रीधर महाराज, उद्योजक वसंत धारव, अनुसया बेलेकर यांच्या हस्ते ग्रंथ पूजन, ममदापूर येथील इंगळे गुरुजी, ग्रामपंचायत सदस्या शाराबाई सुतार, मिथून पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन होणार आहे.
सोळा काळात दररोज पहाटे ४ वाजता काकड आरती, सकाळी १० वाजता हरी भजन, दुपारी १२ वाजता भोजन विश्रांती, सायंकाळी ४ वाजता हरिपाठ, रात्री ७ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सोहळा काळात श्रीधर महाराज-जत्राट, ज्ञानेश्वर महाराज- हेरवाड, नदाफ महाराज -यळगुड, पन्हाळकर महाज -उत्तूर यांची प्रवचन व कीर्तन सेवा होणार आहे. रविवारी (ता.५) सकाळी ज्ञानेश्वरी पारायण व अध्याय पठण पारायण होणार आहे. सोमवारी (ता.६) सकाळी सकाळी ७ वाजता दिंडी नगर प्रदक्षिणा, सकाळी ९ वाजता बाजीराव पाटील महाराज -सरवडे यांचे काल्याचे किर्तन, दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे वाटप होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta