Sunday , April 5 2026
Breaking News

मानकापूर येथील आंतरराज्य चोरट्याकडून १६ दुचाकी जप्त, संशयितही ताब्यात

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून मानकापूर येथील नागेश तानाजी केंगारे (वय २६) याला अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे ८ लाख रुपये किमतीच्या १६ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
कोडणी येथील अजित कौलवकर यांची दुचाकी हालशुगर कारखाना परिसरातील कृषी प्रदर्शनातून चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.
तपास आणि अटक प्रक्रिया
डीएसपी गोपाळकृष्ण गौडर आणि सीपीआय बी. एस. तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी आणि एलसीबी पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान, निपाणी-मुरगुड मार्गावरील गायकवाडी जवळ नागेश केंगारे हा चोरीच्या दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने इचलकरंजी, शहापूर, कोडणी, रेंदाळ आणि निपाणी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरीची पद्धत आणि कार्यपद्धती तपासात धक्कादायक माहिती समोर आली की, नागेश हा एमआयडीसीमधील एका कारखान्यात शिफ्टमध्ये काम करत होता. कामावरून वेळ मिळाला की तो गावोगावी फिरून दुचाकी चोरा चोरी केलेल्या या दुचाकींची तो यळगुड येथील एका गॅरेज चालकाच्या मदतीने ‘मॉडिफाय’ (स्वरूप बदलणे) करून घ्यायचा, जेणेकरून त्या ओळखू येऊ नयेत. त्यानंतर या गाड्या आडी गावाबाहेर एका गॅरेज शेजारी विक्रीसाठी लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला असून दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील जयंतीनिमित्त बोरगावमध्ये ११ एप्रिल रोजी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *