Sunday , April 5 2026
Breaking News

यरनाळ अंबिका देवी यात्रेनिमित्त निमित्त धार्मिक कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी जवळील यरनाळ येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त सोमवार (ता. ६ ते) बुधवार अखेर (ता. ८) आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह शर्यतींचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यात्रा कमिटीने दिली.

सोमवारी (ता. ६) सायंकाळी ७ वाजता पारंपरिक विधी होणार असून सुवासिनींतर्फे पाणी आणणे, मंगळवारी (ता.७) रोजी सकाळी ७ वाजता अंबाबाई देवीस अभिषेक व पेहराव, सकाळी ९ वाजता दंडवत आणि नैवेद्य, दुपारी ४ वाजता देवीची कलश मिरवणूक, रात्री १० वाजता देवीची सवाद्य पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे. बुधवारी (ता. ८) रोजी सकाळी ७ वाजता श्री मरगुबाई देवीला पेहराव व नैवेद्य अर्पण करणे, दुपारी ४ वाजता पाडा बैलगाडी, जनरल बैलगाडी -शर्यत होणार आहे. या स्पर्धेसाठी अनुक्रमे १० हजार १ रुपये, ७ हजार १ रुपये आणि ५ हजार १रुपये व ढाल अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. जनरल घोडा-गाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ५ हजार१ रुपये, ३ हजार १ रुपये आणि २ हजार १ रुपये व ढाल, आदत बैल- घोडागाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ५ हजार १ रुपये, ३ हजार १ रुपये आणि २ हजार १ रुपये व ढाल, नवतर व जनरल घोडा गाडी शर्यतीसाठी अनुक्रमे ५ हजार १ रुपये, ३ हजार१ रुपये २ हजार १ रुपये व ढाल अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते दिली जाणार आहेत. गुरुवारी (ता. ९) रात्री ९ वाजता मायबोली गीतराधाई व रात्री १० वाजता तमाशाचा कार्यक्रम होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील जयंतीनिमित्त बोरगावमध्ये ११ एप्रिल रोजी शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्रावकरत्न स्वर्गीय रावसाहेब पाटील (दादा) यांच्या ८२ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *