Tuesday , April 7 2026
Breaking News

बोरगांव पिकेपीएस संघाला १.६३ कोटींचा नफा

Spread the love

 

सहकाररत्न उत्तम पाटील ;२०९३ शेतकऱ्यांना शुन्य व्याजदराने पत वितरण

निपाणी (वार्ता) :  शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचा आर्थिक विकास डोळ्यासमोर ठेवून स्वर्गीय रावसाहेब पाटील यांनी बोरगाव पिकेपीएस संघाची स्थापना केली. बोरगावसह परिसरातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना देत जिल्ह्यात सर्वाधिक पत मिळवणाऱ्या या पिकेपीएसला आर्थिक वर्षात १ .६३ कोटींचा नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दिली. संस्थेच्या कार्यालयात आयोजित ते बोलत होते.
उत्तम पाटील म्हणाले, जिल्ह्यात सर्वाधिक पत मिळवून, २०९३ शेतकऱ्यांना शुन्य टक्के व्याज दराने पत वितरण करणारी एकमेव संस्था म्हणून नावरुपास आली आहे. निस्वार्थी संचालक मंडळ, प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी सभासदांचा संस्थेवरील विश्वासामुळे संस्थेने यश मिळवले आहे. ठेवी, कर्ज वाटप, नफा एनपीए प्रमाणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संस्थेचे ३०६८ सभासद, २ कोटी ६९ लाख ४० हजाराचे भाग भांडवल, ६६ कोटी ४४ लाख ५९ हजार ठेवी, १२ कोटी ३३ लाखावर निधी, २१ कोटी ७ लाखाचे बीडीसीसी कर्ज, ५२ कोटी ७२ लाखावर सभासद कर्ज वितरण केले आहे. ४४ कोटी ६१ लाखची गुंतवणूक करून आर्थिक वर्षात १ कोटी ६३ लाख ७२ हजार रुपयांचा नफा झाल्याचे सांगितले.
सी.ई.ओ. आर.टी. चौगुले यांनी, सहकार क्षेत्रात काम करताना सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य दिले आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक विविध योजना हाती घेण्यात येत आहेत. कर्ज घेतलेल्या ६० वर्षाच्या आतील सभासदांचे आकस्मिक निधन झाल्यास विमा योजने अंतर्गत १ लाख रुपयांचा धनादेश देण्यात येत असल्याचे सांगितले.

यावेळी ‘अरिहंत’चे कार्याध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील, उपाध्यक्ष सुमित रोड्ड, संचालक राजेंद्र पाटील, प्रदीप माळी, प्रवीण पाटील, राजेंद्र ऐदमाळे, सुनिता बंकापुरे, प्राजक्ता पाटील, राजू गजरे, सहाय्यक कार्यनिर्वाहक राकेश फिरगन्नवर व कर्मचारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत ११ पासून ‘अरिहंत चषक’ क्रिकेट स्पर्धेचा धमाका

Spread the love  सहकाररत्न दिवंगत रावसाहेब पाटील जयंती निमित्त आयोजन :१२ लाखाच्या खर्चाची प्रथमच स्पर्धा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *