
निपाणी (वार्ता) : निपाणी येथील जुन्या पी.बी. रोड वरून शिंत्रे कॉलनीत जाण्यासाठी १२ फूट रुंदीचा रस्ता कॉलनीमध्ये नागरिक व वाहने जाण्यासाठी कॉलनी मालकानी सोडला आहे. या रस्त्यावरून कॉलनीतील नागरिक अनेक वर्षापासून ये-जा करत आहेत. पण पाण्यातील कार्यालया समोरच तिळवे यांनी नवीन कमर्शिअल इमारत बांधली आहे. त्यामुळे कॉलनीच्या १२ फूट रुंदीच्या रस्त्यावर किमान २ फूट अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे कॉलनीतील रहिवाशाचे गैरसोय होत आहे. तरी नगरपालिकेने अतिक्रमण काढून नागरिकांची अडचण दूर करण्याची मागणी उदय नागराळे, शिवानंद कदम यांच्यासह कॉलनीतील रहिवाशांनी केली आहे. याबाबतचे निवेदन नगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे.
निवेदनातील माहिती अशी, कमर्शिअल गाळयामुळे पुन्हा २ फूट वाहने उभी केली जात आहेत. त्यांनी पार्किंगसाठी स्वतःची एक इंचही जागा सोडलेली नाही. पाण्याची पाईप कट्टा करून पायऱ्यासह १२ फूट रस्त्यावर भक्कम बांधकाम केले आहे. अतिक्रमणाचे बांधकाम २ फूट रुंद व ७५ फूट लांबीचे आहे. त्यामुळे कॉलनीतील राहणाऱ्या नागरिकांना व रहदारीला अडचण होत आहे. अतिक्रमणाची बाब बऱ्याचदा तिळवे कुटुंबियांच्या निदर्शनास आणून दिले आहे. शिवाय नगरपालिके समोरील जुन्या पी. बी. रोड वरही किमान ५ फूट अतिक्रमण झाले आहे सदर रस्त्यावरील अतिक्रमण हे जागा मालकाच्या नियमानुसार व कॉलनीतील नागरिकांच्या सहमतीने हटवत आहोत. याची नोंद घेऊन त्यांच्यावर बांधकाम परवानाप्रमाणे कायदेशीर कारवाई करून कॉलनीतील नागरिकांना सहकार्य करून न्याय देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर एस. ए. नदाफ, टी. एस. नदाफ, एस. एस. तारळे, आर. एस. कमते, जे. एम. पाटील, आर. टी. कदम, एल. एस. कदम, हारुण पटेल, स्नेहल जाधव, आर. एस. शेट्टी यांच्यासह शिंत्रे कॉलनीतील नागरिकांच्या सह्या आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta