
कोगनोळी : कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या गणेश कॉलनी ते भगवा रक्षक चौक पर्यंतचा रस्ता कामाचा शुभारंभ बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जोल्ले यांच्या हस्ते झाले.
कोगनोळी भाजपाध्यक्ष कुमार पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून कोगनोळी गावासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. कोगनोळी येथील भगवा सर्कल ते गणेश कॉलनी रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. या ठिकाणी रस्त्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी पीडब्ल्यूडी खात्यातून मंजूर केला आहे.
यावेळी बसवप्रसाद जोल्ले म्हणाले, मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघाचा कायापालट केला असून मतदार संघामध्ये कोट्यावधी रुपयांची विकासकामे केली आहेत. नागरिकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिले आहेत.
यावेळी ग्राम पंचायत सदस्य सुनील माने, ग्राम पंचायत सदस्या विद्या व्हटकर, कुमार व्हटकर, अरुण पाटील, आप्पाचीवाडी ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे, तौसीप मुल्ला, अमित गायकवाड, बाळासो नाईक, अमोल नाईक, प्रकाश पोवार, रणजीत व्हटकर, किशोर व्हटकर, रामचंद्र कोळी, अजित पाटील, ओमकार हंचिनाळे, पिंटू कुंभार, रावसाहेब खोत, वैभव पाटील, रामचंद्र कोळी, शकील नाईकवाडे, रंगराव कागले, विक्रम पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थ, महिला, भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta