विक्रमी उत्पादनाचा पितापुत्रांनी केला विक्रम
हंचिनाळ : वेंकटेश्वरा पावर प्रोजेक्ट या ऊस कारखान्यातर्फे दिल्या जाणाऱ्या विक्रमी ऊस उत्पादनामध्ये 2020-21 या सालाकरिता दिलेल्या पुरस्कारांमध्ये हंचिनाळ येथील चार शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादनाचे अव्वल क्रमांक पटकावल्याबद्दल कारखान्यामार्फत त्यांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र शाल, श्रीफळ देऊन कारखान्याचे चेअरमन महादेवराव महाडिक, कार्यकारी संचालक स्वरूप महाडिक, अमल महाडिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
हंचिनाळ येथील शेतकऱ्यांनी अव्वल क्रमांक पटकावून दाखवून दिले आहे.
येथील प्रगतशील व उपक्रमशील शेतकरी श्री. बाळासाहेब आण्णासो नलवडे यांनी आडसालीमध्ये एकरी 116 मेट्रिक टन इतका विक्रमी उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकाविला. तर त्यांचेच सुपुत्र कुमार रोहित बाळासाहेब नलवडे यांनी पूर्वहंगामी स्पर्धेत 97 टन विक्रमी उत्पादन घेऊन प्रथम क्रमांक पटकावला. तर बाळासाहेबांचे बंधू श्री. रावसाहेब अण्णासो नलवडे यांनी आडसालीमध्ये एकरी 103 टन विक्रमी उत्पादन घेऊन तिसरा क्रमांक पटकावला. तर पूर्वहंगामीमध्ये प्रति एकरी 70 टन विक्रमी ऊस उत्पादन घेऊन मारुती रामगोंडा चौगुले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. चौघांच्या या विक्रमी उत्पादनामुळे विशेष करून एकाच घरात पितापुत्रांनी दोन्ही कालखंडामध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांची विशेष कौतुक व अभिनंदन परिसरात होत आहे. यामुळे तालुक्यात गावचे नाव चर्चेत आले असून तालुक्यात हंचिनाळ गाव सर्वात अधिक शेती उपक्रम करणारे गाव म्हणून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
यावेळी दोन्ही प्रकारात प्रथम क्रमांक पटकावले बाळासाहेब नलवडे बोलताना म्हणाले की, हंचिनाळ गाव निपाणी तालुक्यात शेती मधील विविध उपक्रम करणारे व पालेभाज्यांमध्ये नाव असलेले गाव म्हणून नावारूपास मागील काही वर्षांमध्ये पुढे येत आहे तसेच तसेच शेती व्यवसाय हा सरकारी नोकरी व इतर व्यवसाय यापेक्षा अधिक उत्पादन देणारा ठरू शकतो. शेती व्यवसायाकडे कनिष्ठ म्हणून पाहिले जाते परंतु सरकारी नोकरी आणि इतर कोणत्या व्यवसाय बरोबरच शेतीमध्येही युवकांना करिअरची उत्तम संधी असून आधुनिक पद्धतीने शेती केल्यास शेतकऱ्याचा आणि पर्यायाने देशाचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन केले.
यावेळी मुख्य शेती अधिकारी राजेश कावणे, ऊस विकास अधिकारी अमित नलवडे, सुहास उगळे, प्रमोद पाटील, स्लीप बॉय संजय पाटील, ज्येष्ठ ग्रापं सदस्य मारुती हवालदार, आण्णासो मंगसुळे, सुधाकर पवार, मधुकर चौगुले, शिवगोंडा सटवान, तुळशीदास नलवडे, निलेश नलवडे, आर. एल. चौगुले, केशव पाटील, विकास नलवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.