येळ्ळूर : येथील विश्व भारत सेवा समितीच्या श्री शिवाजी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वभारत सेवा समितीचे संस्थापक माजी आमदार परशुराम नंदीहळ्ळी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभिनेते आणि चित्रपट निर्माते डॉ. गणपती पाटील नेताजी सोसायटीचे चेअरमन डी.जी. पाटील, प्रा. सी. एम. गोरल, हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष गणपत मारीहाळकर , एम. एन. तमुचे, सौ. मनीषा कूगजी, अस्मिता पाटील, गीता काकतकर उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे उपस्थित होते. मुलींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. प्रा. सी. एम. गोरल यांच्या हस्ते सरस्वती फोटोचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर यांनी केले. शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून मान्यवरांचा मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप दिला. तर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप घेणारी भाषणे केली. शिक्षकांच्या वतीने शिक्षिका विद्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. गणपती पाटील यांनी आपला जीवन प्रवास उलगडला. चित्रपट तसेच चित्रपटात साकारलेल्या भूमिका बद्दल माहिती दिली. समाजातील दुर्बल घटकांना सहय्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी जीवन संघर्ष फाउंडेशन नावाची स्वयंसेवी संस्था स्थापन केली आहे. त्यांनी शाळेच्या सुधारणेसाठी दोन लाख 50 हजार रुपये आर्थिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेच्या प्रगतीबद्दल डी. जी. पाटील यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शाळेतील इतर सुविधांची पूर्तता करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी खुर्ची देण्याचे आश्वासन दिले. यावेळी प्रमुख वक्ते परशराम मोटराचे यांनी विद्यार्थ्यांना दहावी अभ्यासक्रमाबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी सन 2020 21 सालात एसएसएलसी परीक्षेत विद्यालयात प्रथम कुमारी संजना चिट्टी, द्वितीय कुमारी रेणुका गोरल व तृतीय कुमार प्रशांत मुरकुटे यांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. आदर्श विद्यार्थी सुजल सुळगेकर व आदर्श विद्यार्थिनी कुमारी शिवानी काकतकर यांचाही पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. शाळेसाठी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी तिजोरी कपाट भेट म्हणून दिले. व्यासपीठावरील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. सूत्रसंचालन शिक्षक एस. बी. मजूकर यांनी केले, तर आभार रेखा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला पालक विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शालेय मंत्रिमंडळ, एच. एस. लोकळ्ळुचे, एस. पी. मेलगे व एम. बी. पंतर यांनी परिश्रम घेतले.
Check Also
आनंदनगर नाल्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
Spread the love बेळगाव : आनंदनगर – वडगाव येथील नाल्याचे बांधकाम खासगी जागेतून का करण्यात …