Sunday , September 8 2024
Breaking News

सामाजिक कार्यकर्त्यांने जोपासला तलाव स्वच्छतेचा वसा!

Spread the love
सलग चौथ्या वर्षी उपक्रम : तलावाच्या पाणीसाठ्यात होतेय वाढ
 निपाणी (वार्ता) : येथील शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जवाहर तलाव परिसरात पावसाळ्यातील पाणी ओढ्यामार्गे तलावात येते. पण काही वर्षांपासून पाणी येणाऱ्या मार्गावर काटेरी झाडांसह टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात पडल्या होत्या. त्यामुळे पावसाचे ओढ्यामार्गे तलावात पाणी येण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते सचिन लोकरे हे तलाव परिसराची स्वच्छता करण्यासाठी गेल्या तीन वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे पावसाळ्यातील बरेच पाणी तलावात जाऊन साठा वाढत आहे. यंदा तलाव परिसर स्वच्छतेचे चौथे वर्ष असून त्याची तयारी पूर्ण केली आहे.
शहर आणि परिसरातील काही नागरिक तलावाच्या परिसरात असणाऱ्या ओढ्याच्या ठिकाणी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, घरातील टाकाऊ वस्तू व कचरा टाकतात त्यामुळे पावसाळ्यात ओढ्याचे पाणी तलावात जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो. त्याशिवाय काटेरी झुडपे व गारवेल मुळे ही पाण्याचे स्तोत्र बदल्यात असल्याने त्याचीही स्वच्छता केली जाणार आहे.
गतवर्षी ओढ्याच्या स्वच्छतेसाठी पर्यावरणप्रेमी नागरिकांसह उत्तम पाटील युवामंचतर्फे जेसीबीद्वारे पर्यावरणप्रेमी नागरिकांसह लोकरे व सहकाऱ्यांनी दर रविवारी तलाव परिसरातील कचरा संकलित करून तो बाहेर टाकला. त्यानंतर पाण्याला अडथळा ठरणारी काटेरी झुडपे काढण्यासाठी जेसीबीचा वापर केला. त्यामुळे उत्तम पाटील युवामंचच्या कार्यकर्त्यांतर्फे जेसीबीद्वारे स्वच्छता करण्यात आली. ओढ्याच्या मार्गावरील काटेरी झुडपासह टाकाऊ वस्तू जेसीबीच्या सहाय्याने बाजूला केल्या. त्यामुळे पाण्याला चांगली वाट रहुल जवाहर तलावात पाणीसाठा झाला होता. त्यामुळे तलावातील पाणी पातळी वाढण्यास मदत झाली होती.
यंदा तलाव परिसर स्वच्छतेचे चौथे वर्ष असून त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांसह निपाणी नगरपालिका, समाजसेवा संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे
——————–
लोकरे यांच्या प्रयत्नाला यश भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन सचिन लोकरे यांनी गेल्या तीन वर्षापासून ‘एकला चलो…’ चा नारा देत स्वच्छता सुरू केली होती. हळूहळू पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही सहकार्य केल्याने ओढ्यासह परिसराची स्वच्छता झाली. त्यामुळे सतत पडणाऱ्या पावसाचे पाणी जवाहर तलावात पोचले होते. त्यामुळे लोकरे यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.
——————————–
‘जवाहर तलावापासून आज शहर आणि उपनगरात पाणीपुरवठा होतो. पण तलाव परिसरातील यामध्ये टाकाऊ वस्तू आणि झाडेझुडपे वाढल्याने पावसाचे पाणी तलावात कमी प्रमाणात जात होते. ही बाब लक्षात घेऊन गेल्या तीन वर्षांपासून आपण हा उपक्रम राबवत आहे. एप्रिल दर रविवारी सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत पुन्हा ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे.’
– सचिन लोकरे, सामाजिक कार्यकर्ते,निपाणी

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *