निपाणी (वार्ता): कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमीटीचे कार्याध्यक्ष व यमकनमर्डी मतदारासंघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी, चिक्कोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, सुजय पाटील यांनी निपाणी येथील लाफायट हॉस्पीटल समोरील “ओम”ताक व लस्सी सेंटरला भेट दिली. शिवाय येथील ताक व लस्सीचा आनंद लुटला. तसेच राहुल जारकीहोळी यांनी निपाणी भागातील घडामोडींची माहिती घेतली. यावेळी ओम ताक लस्सी सेंटरचे मालक बाळासाहेब कमते, इंद्रजीत बगाडे, अवधुत गुरव, प्रशांत हांडोरी, विशाल ढापळे, सुखदेव मगदुम यांच्यासह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
नांदणीत १ जानेवारीपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक
Spread the love जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी : ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) …