तिसऱ्यांदा मिळाला शाळेला एल आय सी चा सन्मान.
हंचिनाळ : येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार भारतीय आयुर्विमा महामंडळातर्फे निपाणी शाखेचे शाखाधिकारी संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडी. हंचिनाळ ग्रामपंचायतीचे चेअरमन बबन हवलदार. हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विकास अधिकारी शेखर शेट्टी व स्नेहा महाजन मॅडम उपस्थित होत्या.
येथील शाळेच्या भव्य प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी नामदेव दिंडे यांनी स्वागत तर मुख्याध्यापक आर. एम. कांबळे यांनी प्रास्ताविक केले.
त्यानंतर गेल्या वर्षी पहिली ते सातवी या वर्गामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा एलआयसीतर्फे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शालेय साहित्य देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी बोलताना एलआयसीचे शाखाधिकारी संजय कदम सर म्हणाले की, एलआयसी जगातील सर्वाधिक मोठी विमा संस्था असून भारतात सर्वाधिक रक्कम संग्रह करणारी आर्थिक संस्था आहे आणि संस्थेची उलाढाल. कित्येक देशांच्या जीडीपी पेक्षा प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना शेखर शेट्टी म्हणाले की आजच्या धावपळीच्या युगात विमा हा अत्यंत गरजेचा बनला असून प्रत्येक व्यक्तीला विम्याची पुरेसे संरक्षण असायला पाहिजे त्या करता प्रत्येक पात्र व्यक्तीने विमा काढला पाहिजे असे सांगितले.
यावेळी स्नेहा महाजन मॅडम यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला एसडीएमसी चेअरमन सुशांत वंदूर पाटील उपाध्यक्षा मनिषा गवळी. विमा प्रतिनिधी सौ. सुजाता नलवडे. उत्तम नलवडे, सागर पाटील, ज्येष्ठ ग्रा.पं. सदस्य एम. वाय. हवालदार, दादासो जनवाडे, संजय बस्तवडे, गंगाराम पनदे, विलास गायकवाड, तानाजी जाधव, दादासो जनवाडे, कृष्णात पाटील, बाळासो पाटील, सुप्रिया कांबळे, लक्ष्मी कानडे, रेखा पाटील यांच्यासह एसडीएमसीचे सर्व सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी आर. ए. हरदारे यांनी आभार मानले.
Check Also
चिक्कोडीत दुचाकीचा भीषण अपघात : शिक्षक ठार
Spread the love चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी गावाजवळ दुचाकी घसरल्याने झालेल्या अपघातात एक संगीत …