निपाणी (वार्ता) : दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब यांच्यावतीने येथील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ता शौकत मणेर यांना पुरस्कार घोषित करण्यात आला होता. रविवारी नवी दिल्ली येथील एका कार्यक्रमात त्यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
शौकात मणेर यांनी पर्यावरण व जैविक विविधता संवर्धनासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत सदर पुरस्कार देऊन त्यांना विश्व संत कबीर पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. यावेळी जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी, रामनरेशाचार्य स्वामी, विचारदासजी महाराज यांच्यासह देशभरातील विविध राज्यातून उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना या सोहळ्यात गौरविण्यात आले. कर्नाटकातून एकमेव असलेल्या सन्मानामुळे त्यांचे निपाणी व परिसरात कौतुक होत आहे.
