कोगनोळी : हिंदूंच्या सणा पैकी प्रमुख मानल्या जाणार्या गुढीपाडव्याच्या सणाची लगबग सर्वत्र दिसून येत आहे.
कोगनोळी तालुका निपाणी येथे शनिवार तारीख 2 रोजी असणार्या गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर येथील अंबिका मंदिराजवळ मेसकाट्यांची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे.
चालू वर्षी कोरोना संसर्ग कमी झाला असल्याने व शासनाने सणसमारंभ वरील बंदी उठवल्याने सण समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत आहेत.
परिसरात गुढीपाडव्याला गुढी उभारण्यासाठी लागणार्या मेस काट्यांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
येथील अंबिका मंदिराजवळ हे मेसकाठी विक्रेते 100 रुपये, 150 रुपये, 200 रुपये अशी मेस काट्यांची विक्री करत आहेत.
याच बरोबर स्टेशनरी व किराणा दुकानात गुढीसाठी लागणार्या पुजेच्या साहित्याची खरेदी करताना ही नागरिक दिसत आहेत. गुढीसाठी लागणारे कलश, वस्त्र, साखरेची माळ आदी साहित्य दुकानात मांडण्यात आले आहे.
यावेळी बोलताना अनिल कोरवी म्हणाले, गेल्या वर्षीच्या तुलनेत मेस काटीचे दर वाढले आहेत. सध्या मेसकाटी खरेदी करण्यासाठी गर्दी कमी असली तरी एक-दोन दिवसांमध्ये मेसकाठी खरेदी करण्यासाठी नागरिक गर्दी करतील असे सांगितले.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …