कोगनोळी केंद्रात परिक्षा सुरु : नियमाचे पालन
कोगनोळी : येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोगनोळी हायस्कूलमध्ये दहावी परिक्षा सुरळीत सुरु झाली.
सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांना तपासून व सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन सोडले.
या परिक्षा केंद्रावर कोगनोळी, सुळगांव, मत्तिवडे, हंचिनाळ, आप्पाचीवाडी येथील 243 विद्यार्थी यामध्ये 114 मुले तर 129 मुली परिक्षा देण्यासाठी उपस्थित राहिले. याठिकाणी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी 15 खोल्यांमध्ये व्यवस्था केली आहे, असे केंद्र प्रमुख आर. आर. नवाळे यांनी सांगितले. याशिवाय अतिरिक्त दोन खोल्या सज्ज ठेवल्या आहेत. आज पहिल्या दिवशी मराठी पेपर झाला. बुधवार तारीख 30 रोजी इंग्लिश, सोमवार तारीख 4 रोजी गणित, बुधवार तारीख 6 रोजी समाज विज्ञान, शुक्रवार तारीख 8 रोजी कन्नड, सोमवार तारीख 11 रोजी विज्ञान असे पेपर होणार आहेत.
या ठिकाणी परीक्षा केंद्र अधिकारी म्हणून आर. आर. नवाळे, मोबाईल अधिकारी एस. एम. रजपुत, प्रश्नपत्रिका निरिक्षक पी. के. कांबळे यांच्यासह 20 शिक्षक निरीक्षक म्हणून काम करत आहेत.
या ठिकाणी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने जे. बी. पाटील, शिवप्रसाद यांनी बंदोबस्त ठेवला आहे. तर बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सेविका, आशा कार्यकर्त्या अनिता चौगुले, वर्षा सूर्यवंशी, विद्या शिंत्रे, माया पाटील याठिकाणी काम पाहत आहेत.
————
सकाळी आठ वाजल्यापासून विद्यार्थी परिक्षा केंद्रावर हजर झाले. सुरक्षित अंतरासाठी चौकोण, सॅनिटायझरने हात स्वच्छ, दोन विद्यार्थी मध्ये योग्य अंतर आदी सह सुविधा उपलब्ध केला आहेत.
– किरण नवाळे, मुख्याध्यापक कोगनोळी हायस्कूल.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …