Tuesday , March 3 2026
Breaking News

आंबेडकरी विचारांचा सन्मान करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा डॉ. आंबेडकर मंचच्या वतीनेतर्फे सत्कार

Spread the love
निपाणी (वार्ता) : गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीच्या काळामुळे संपूर्ण देशामध्ये महामानव डॉ. आंबेडकरांची जयंती न झाल्यामुळे त्यांच्या संपूर्ण अनुयायांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली होती. परंतु यावर्षी जयंतीसाठी योग्य वातावरण असल्यामुळे व आंबेडकरी विचार गतिमान व्हावी, या उद्देशाने त्यांची प्रेरणा व विचार आत्मसात करण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील सर्व ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करण्याचा आदेश बेळगावचे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. यामुळे जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाज अतिशय उत्साही झालेला आहे. या महत्त्वपूर्ण आदेशामुळेच निपाणीतील डॉ.आंबेडकर विचार मंचच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या आदेशामुळे खऱ्या अर्थाने एक आंबेडकरी विचारांचे जिल्हा अधिकारी मिळाल्याचे मत, संघटनेचे अध्यक्ष प्रा. सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले.
यावेळी जिल्ह्याचे नेते मल्लेश चौगुले, युवा नेते अमित शिंदे, रमेश कांबळे, राजीव कांबळे, साजन घस्ते, बबन भोसले, प्रवीण सौंदलगे, रतन पोळ, प्रणित घस्ते, किसन दावणे, अशोक लाखे, संदीप कांबळे, सागर कांबळे यांच्यासह मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *