कोगनोळी : येथील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेचे क्रीडाशिक्षक महादेव कोरव यांना नॅशनल रुलर डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव व हेल्थ नेचर डेव्हलपमेंट सोसायटी बेळगाव यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले.
हा पुरस्कार सोहळा चिक्कोडी येथे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, ब्रिगेडियर इंडियन आर्मी मुंबई दीपक सावंत, कोल्हापूरचे महापौर राजू शिंगाडे, जिल्हा पोलीस प्रमुख गुलबर्गा महेश मेघानावर आदी मान्यवरांच्या हस्ते दिला.
यामुळे महादेव कोरव सर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
महादेव कोरव सर 1997 साली यदगुड तालुका हुक्केरी येथील शाळेत आपल्या नोकरीची सुरुवात केली. गेल्या पंचवीस वर्षापासून ते अविरत ज्ञानदानाचे काम करत आहेत. क्रीडा शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी राज्य व देश पातळीवर नेवून नावलौकिक केला आहे. त्यांना आतापर्यंत आदर्श शिक्षक पुरस्कार, चंद्रशेखर शिवाचार्य हुक्केरी मठ यांच्यावतीने जानपद प्रशस्ती पत्र मिळाले आहे. गेल्या चार वर्षापासून ते कोगनोळीमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करत आहेत. गेल्या दोन वर्षात पाठीमागे त्यांना कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार मिळाला आहे. या सर्व गोष्टीची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात येत असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
Check Also
गट, तट विसरून शेतकऱ्यांनी एकत्रित यावे
Spread the love राजू पोवार; विधानसभेवरील मोर्चाबाबत जत्राट मध्ये बैठक निपाणी (वार्ता) : दोन वर्षापासून …