Monday , December 8 2025
Breaking News

शेतकर्‍याच्या न्याय हक्कासाठी रयत संघटना सदैव तत्पर

Spread the love


राजू पोवार : दत्तवाडी येथे शाखा उद्घाटन
कोगनोळी : आज बाजारपेठेमध्ये सर्व वस्तूचे दर निश्चित आहेत. पण शेतकर्‍याच्या शेतातून निघणार्‍या शेतीमालाचा दर निश्चित नाहीत. शेतकर्‍याची सर्व स्तरातून अडवणूक होत आहे. शेतकरी जर सुजलाम सुफलाम व्हायचा असेल तर शेतकर्‍यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. एकत्र येऊन काम केल्याशिवाय शेती मालाला योग्य भाव मिळणार नाही. शेतकर्‍यांच्या समस्या सोडवण्यासाठी रयत संघटना सदैव तत्पर राहील. शेतकर्‍यांनी वीज बिल भरले नाही म्हणून त्याच्या घरातील वीज कट केले जाते. पण त्या शेतकर्‍याच्या शेतातील पिक विद्युत प्रवाह यामुळे जळून खाक होतो. त्याला एक रुपयाचाही मोबदला मिळत नाही. शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी रयत संघटना शेतकर्‍यांच्या पाठीशी राहील. शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी रयत संघटना सदैव तत्परतेने काम करत आहे, असे मनोगत रयत संघटना चिक्कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले.
दत्तवाडी तालुका निपाणी येथे रयत संघटना शाखा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कोगनोळी शाखा अध्यक्ष अनंत पाटील हे होते.
स्वागत शुभांगी बिद्रोळे यांनी तर प्रास्ताविक निपाणी युवा अध्यक्ष बाळासाहेब हदीकर यांनी केले.
पुढे बोलताना राजू पोवार म्हणाले, रयत संघटनेच्या वतीने शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी पुकारलेल्या आंदोलनाची कोणत्याही प्रकारची पोस्टरबाजी केली जात नाही. उलट रयत संघटनेने केलेले काम आम्ही केलं म्हणून सांगणारे अनेक लोक आहेत. या सर्व गोष्टीकडे शेतकर्‍यांनी लक्ष न देता रयत संघटनेच्या पाठीशी ठामपणे राहावे. रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांसह सर्वसामान्याच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव तयार आहोत असे शेवटी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आय. एन. बेग, निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, शाखाध्यक्ष गणपती बिद्रोळे, निपाणी ग्रामीण युवा अध्यक्ष बाळासाहेब हदीकर, आडी शाखा अध्यक्ष बाबासाहेब पाटील, पडलिहाळ शाखाध्यक्ष संजय जाधव, बुध्दीहाळ शाखाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जैनवाडी शाखाध्यक्ष नामदेव साळुंखे, शिवापुरवाडी शाखाध्यक्ष संजय जोमा, गजबरवाडी शाखाध्यक्ष शिवगोंडा निकम, अशोक तोडकर, मत्तिवडे शाखा उपाध्यक्ष चिनू कुळवमोडे, अशोक तोडकर, शिवाजी वाडेकर, रमेश पाटील, तानाजी पाटील, विठ्ठल रजपुत, बाळासाहेब कांबळे यांच्यासह दत्तवाडी, कोगनोळी येथील रयत संघटनेचे पदाधिकारी सदस्य, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव पट्टणपंचायतीच्या निधीतून आयको परिसरात पाणी योजनेचे उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : बोरगाव उपनगर असलेल्या आयको येथील मल्लिकार्जुन नगरमधील नागरिकांना अनेक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *