Sunday , September 8 2024
Breaking News

टोल दरवाढीचा वाहनधारकांना भुर्दंड

Spread the love

कोगनोळी : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यावतीने शुक्रवार तारीख १ च्या मध्यरात्रीपासून टोल दर वाढवण्यात आल्याने वाहनधारकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
सध्या पेट्रोल-डिझेलची दरवाढ झाली असून टोल दरवाढीचा वाहनधारकांना मोठा भुर्दंड बसत असल्याचे दिसून येत आहे.
कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या टोलनाक्यावर येणाऱ्या ९५ टक्के वाहनधारकांच्याकडे फास्ट टॅग सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित पाच टक्के लोक हे रोख पैसे भरून टोल नाका पास करत आहेत. फास्ट टॅग नसणाऱ्या वाहनधारकांच्याकडून डबल टोल कर आकारणी करण्यात येत आहे.
कोगनोळी टोलनाक्यावर फास्ट टॅग असणाऱ्या वाहनधारकांना परतीचा टोल सुट फायदा मिळत आहे. ज्या वाहनधारकांच्या कडे फास्ट टॅग नाही अशा लोकांना या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.
टोलनाक्यावर वाहनधारकांच्यासाठी शौचालय, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार अशा सुविधाही देण्यात आले आहेत. टोल नाक्यावर १०५ लोक काम करत असून या ठिकाणी तीन शिफ्टमध्ये काम सुरू आहे.
कोरोना परिस्थिती कमी झाल्यामुळे याठिकाणी वाहनधारकांची संख्या वाढली आहे. दिवसाला सुमारे पंधरा हजार वाहने टोल नाक्यावरून ये-जा करत असतात. अशी माहिती टोल व्यवस्थापक उत्तम पाटील यांनी दिली.
यावेळी संदिप डोंगळे, प्रकाश कागले, नारायण पाटील, योगेश जोशी, गजानन कागीनकर उपस्थित होते.
या ठिकाणी असणारे टोल दर
कार व लहान वाहने 75 रुपये होता. नवीन दर 85 रुपये, रिटर्न 115 होता 125 झाला.
लाईट मोटर व्हेइकल 115 रुपये दर होता 135 रुपये झाला. रिटर्न 175 होता 200 झाला.
ट्रक व बस 245 होता 280 झाला. रिटर्न 370 होता 420 झाला.
थ्री एक्सल वाहने 270 रुपये होता. 305 झाला. रिटर्न 405 रुपये होता 460 झाला.
4 एक्सेल 6 एक्सल 385 होता. 440 रुपये झाला. रिटर्न 580 होता. 660 झाला.
7 एक्सलच्या पुढे 470 होता. 535 झाला. रिटर्न 705 रुपये होता. 800 झाला.
महिना पास कार 275 होता 315 झाला.

About Belgaum Varta

Check Also

श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन

Spread the love  निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *