Wednesday , December 10 2025
Breaking News

निपाणीत युवकाचा खून

Spread the love

एक जण ताब्यात : पैशाच्या देवघेवीवरून कुणाचा संशय
निपाणी (विनायक पाटील) : मूळ गाव सैनिक टाकळी आणि सध्या राहणार निराळे गल्ली येथील रहिवासी असलेल्या अभिषेक शिवानंद दत्तवाडे (वय १९) या युवकावर तिघा मित्रांनी धारदार चाकूने हल्ला करून त्याचा निर्घुण खून केल्याची घटना रविवारी (ता.३) मध्यरात्री येथे घडली. याप्रकरणी खून करणाऱ्या एकाला शहर पोलिसांनी पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघे संशयित फरार झाले आहेत. आर्थिक व्यवहारातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.


घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन निपाणी शहर पोलिसांनी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
अभिषेक हा मूळचा सैनिक टाकळी येथील रहिवासी असून तो येथील चिक्कोडी रोडवरील मॅग्नम चित्रपटगृहात कामावर होता. तो आपल्या आईसह येथील निराळे गल्लीत एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहतो. रविवारी दुपारी आपल्या आई समवेत तो मेतके येथील बाळूमामांच्या दर्शनासाठी गेला होता. त्यानंतर सायंकाळी चार वाजता चित्रपटगृहात त्याची ड्युटी असल्याने तो गेला होता.
रात्री साडेबाराच्या सुमारास तो चित्रपटगृहातील काम आटोपून आपल्या घरात प्रवेश करीत असताना दारातच दबा धरून बसलेल्या तिघा जणांनी आर्थिक व्यवहारातून बाचाबाची केली. पण भांडणे खूप खास गेल्याने तिघांनी मिळून अभिषेकवर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे अभिषेक रक्ताच्या थारोळ्यात पडला.
यावेळी झालेल्या मारहाणीत अभिषेक हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच ठाणे अंमलदार रमेश तळवार, हवालदार विनोद असोदे यांच्यासह उपनिरीक्षक कृष्णवेनी गर्लहोसुर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांची जादा कुमक मागवून परिसरात चोख बंदोबस्त ठेवला. त्यानंतर मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. व एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे. दरम्यान चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक आणि बेळगाव येथील अतिरिक्त पोलीस प्रमुखांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर तातडीने घटनास्थळी चिकोडीचे पोलीस उपाधीक्षक (डीएसपी) बसवराज यलीगार, सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोमवारी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी भेट देऊन पाहणी केली. शहर पोलीसांनी पुढील तपास चालवला आहे. अचानकपणे निपाणी शहरात हा प्रकार घडल्याने शहर हादरले आहे. हल्लेखोर तिघा मित्रांनी अभिषेक याचा किरकोळ रकमेच्या व्यवहारातून हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी अभिषेकवर हल्ला केलेला चाकू रॉड यासह आदी साहित्य जप्त केले आहे. यावेळी पोलिस ठाण्याजवळ अभिषेक त्याचे मित्र आणि नातेवाईकांनी गर्दी केली होती.

About Belgaum Varta

Check Also

निपाणीत शस्त्रधारी चोरट्यांकडून धाडसी घरफोडीचा प्रयत्न

Spread the love  चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद : चोरटे धावले पोलिसांच्या अंगावर निपाणी-(वार्ता) : शहरासह उपनगरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *