Monday , September 21 2026
Breaking News

मराठा समाजात विवाह वेळेवर होण्याबाबत प्राधान्य द्यावे : प्रकाश मरगाळे

Spread the love

बेळगांव : मराठा समाजात आता विवाह वेळेवर होण्याबरोबर इच्छूक मुलींनीही नोकरीवाल्याबरोबर व्यावसायिक मुलांना प्राधान्य द्यावे, असे मत अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केले.
गोवावेस येथील मराठा मंदिर येथे मराठा समाज सुधारणा मंडळ आयोजित वधू-वर सूचक मेळाव्यात ते बोलत होते.
प्रारंभी मंडळाचे हितचिंतक शंकरराव पाटील यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रमुख पाहुणे युवा उद्योजक शीतल वेसणे व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जी.जी. कानडीकर, वधू-वर मंडळाचे प्रमुख ईश्वर लगाडे व खजिनदार के. एल. मजूकर उपस्थित होते.
यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बेळगाव, कोल्हापूर, गोवा, पुणे येथील वधू-वरांनी परिचय करून दिला. यावेळी शीतल वेसणे यानीही शुभेच्छा दिल्या. जी. जी. कानडीकर यांनी स्वागत केले तर शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. ईश्वर लगाडे यांनी वधू-वर मंडळाच्या कार्याबद्दल माहिती दिली. संग्राम गोडसे यांनी आभार मानले.

मेळावा यशस्वी करण्यासाठी एस. ओ. जाधव, अशोक अंकले, राजू पावले, मोहन सप्रे, दत्तात्रय जाधव, प्रकाश गडकरी, सुजाता कांबळे, कविता देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले. सुत्रसंचालन के. एल. मजूकर यांनी केले.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *