परमात्मराज महाराज : ’अंकुरम’च्या शाळा इमारतीचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : जीवनात चांगली कामे होण्यासाठी मोठा जनसमुदाय मागे असणे आवश्यक आहे. विश्वासाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. त्यासाठी विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे. शुद्ध संकल्पनेमुळे यश निश्चित मिळते, असे मत आडी येथील दत्त देवस्थान मधील परमाब्धिकार परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केले. येथील कलानिकेतन संस्थेच्या अंकुरम इंग्लिश मीडियम शाळा इमारतीच्या उद्घाटन समारंभात महाराज बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड येथील माजी सनदी अधिकारी व शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजीत देशमुख होते.
परमात्मराज महाराज म्हणाले, पालकांनी संचालक मंडळावर दृढ विश्वास ठेवल्याने या शाळेचा केवळ तीनच वर्षात विकास होत आहे. त्यासाठी जीवनात नेहमी धडपड करणे आवश्यक आहे. चांगले काम करण्याचे चेतना प्रत्येकानी मनात बाळगली पाहिजे. यश-अपयश अशा दोन्ही वेळी कार्यरत राहणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत असताना धर्माला विसरता कामा नये. जीवनात कोणत्याही प्रसंगाला तोंड देताना विनयता टिकवून ठेवली पाहिजे. शिक्षणाबरोबर संस्कृतीच्या संरक्षणाचे कामही केले पाहिजे. नेहमी चांगल्या विचारांचा आदर्श जीवनात जपल्यास आदर्श पिढी निर्माण होऊ शकते. संस्कृतिक ज्ञानाला विज्ञानाची जोड देऊन शिक्षण संस्थांनी आदर्श समाजाची निर्मिती करावी.
इंद्रजीत देशमुख यांनी, मुलांनाघडवण्याचे काम आई- वडील, शाळा आणि समाजाचे आहे. पूर्वीच्या काळी अनुभवावर मुलांना शिक्षण दिले जात होते. आता मात्र नवनवीन तंत्रज्ञान आले असून त्याद्वारे मुलांना शिक्षण दिले. कोरोना काळात तर मुलांच्या शैक्षणिक जीवनच बदलून गेले आहे. त्या काळात डिजिटल शिक्षण पद्धत मोठ्या प्रमाणात वापरली गेली. पण त्याचा नेमका किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय आहे. आशा शिक्षणामुळे व्यक्तिमत्व विकास होईल का? विद्यार्थ्यांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढून शिक्षण घेतल्यावर प्रगती साधता येत असल्याचे सांगितले.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन झाले. संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अमर चौगुले यांनी, कमी वयात सहज व सुलभ असे नवीन अभ्यासक्रम पद्धत आपल्या पाल्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकासासाठी नव्या प्रणाली अंतर्गत राबवित असलेल्या शिक्षणाची माहिती दिली. प्रियंका भाटले, दीपक वळीवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास चिक्कोडी चे शैक्षणिक उपाध्यक्ष एम. एल. हानचाटे, चिकोडीचे गटशिक्षणाधिकारी बी. ए. मेक्कनमर्डी, अभियंते भरत बेडकिहाळे, डॉ. निला शेट्टी डॉ. संजय पंतबाळेकुंद्री, निपाणी रोटरी क्लबचे अध्यक्ष सोमनाथ परमणे, इंजीनियर असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब ऐनापूरे, अमित रामनकट्टी, सुधाकर सोनाळकर, शाळेच्या संस्थापिका चेतना चौगुले, संस्थेचे विश्वस्त डॉ. उत्तम पाटील, डॉ. बलराम जाधव, कॅप्टन सदाशिव गोविलकर, सतिश रेपे, डॉ. जोतिबा चौगुले, चंद्रकांत खोत, संदिप ननवरे, अमित पाटील, सचिन मोहिते, संतोष यादव, मिना शिंदे, नामदेव चौगुले, विशाल खोत, प्रवीण खोत, संभाजी पाटील, कबीर वराळे, अमित डोंगरसाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
नांदणीत १ जानेवारीपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक
Spread the love जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी : ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) …