
सौंदलगा : सौंदलगा येथील सरकारी मराठी मुलींच्या शाळेमध्ये सातवीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतोष पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यानंतर विद्यार्थिनींनी इशस्तवन सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एसडीएमसीचे अध्यक्ष अजित कांबळे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते बाबू जगजीवनराम व सरस्वतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रास्ताविकात सानिका कारंडे यांनी आजचा दिवस हा आमचा महत्त्वाचा दिवस असून प्राथमिक शिक्षण घेत असताना गेली सात वर्षे विविध शिक्षकांचे सर्वांना मिळालेले मार्गदर्शन महत्त्वाचे असून त्याचा उपयोग पुढे कसा होईल हे सांगितले. यावेळी श्रद्धा चौगुले व वैष्णवी रजपूत यांनी गुलाब पुष्प देऊन सर्वांचे स्वागत केले. यावेळी सानवी चौगुले, साक्षी जूगळेे, संचिता सूर्यवंशी या विद्यार्थ्यांनीनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच मुख्याध्यापक मेस्त्री मॅडम यांनी आजपर्यंत आम्ही तुम्हाला जे मार्गदर्शन केले आहे. त्याचा पुढील जीवनात सर्व विद्यार्थिनींना कसा उपयोग होणार असून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या नेजकर मॅडम, बुर्लहट्टी सर यांनीही शुभेच्छा दिल्या यानंतर एसडीएमसीतर्फे विद्यार्थिनींना वह्यांचे वाटप करण्यात आले.गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी अध्यक्षीय भाषणात अजित कांबळे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्याा. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भिमराव भानसे, बी. आर. चौगुुले, विनोद माने, एसडीएमसी सदस्य सागर चौगुलेे, अनिल मोरे, विनायक माळी, दत्तात्रय कुंभार, शिवानंद साळुंखे, महादेवी साळुंखे,अश्विनी शिगावे, राजश्री कुंभार, वैशाली कुंभार, राणी मेस्त्री, दिपाली पाटील, विना चौगुले, पल्लवी रजपुत बंडा हातकर, पिंटू पाटील, पांडू काळुगडे, संतोष शितोळे यासह विद्यार्थिनी, पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी माळी, स्नेहा चौगुले यांनी केले. तर आभार एस. एस. पाटील सर यांनी मानले
Belgaum Varta Belgaum Varta