शिरोळ तालुका शिवसेनेचा इशारा : प्रवासी, अधिकार्यामध्ये वादावादी
निपाणी : कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन कर्नाटक राज्यात सर्वच सीमेवर आरटीपीसीआर तपासणी नाके उभारले आहेत. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागावर दररोज संपर्कात असणार्या प्रवासी शेतकरी विद्यार्थी व मजूर यांना मुभा देण्याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी सांगितले आहे. मात्र कार्यरत असलेले अधिकारी हे प्रवाशांना अडविणे, त्यांना त्रास देणे, शिवाय कोरोना लस घेतलेले प्रमाणपत्र दाखवून सुद्धा सोडले जात नाही. या ठिकाणी सुरळीत वाहतूक व्यवस्था न केल्यास शिरोळ तालुका शिवसेनेच्या वतीने पाच मैल या सीमा नाक्यावर आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी दिला आहे. पाच मैल सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातील प्रवासी व कर्नाटक राज्यातील अधिकारी यांच्यात वादावादी झाली.
येथे कार्यरत असलेले पोलीस अधिकारी पैसे घेऊन काहींचे वाहने सोडतात, काहींना मुद्दामून त्रास देतात, रात्रीच्या वेळी याठिकाणी वाहने सुसाट जातात, असा आरोपही प्रवाशांतून केला गेला.
शिरोळ तालुका शिवसेना उपप्रमुख युवराज घोरपडे म्हणाले, कर्नाटक राज्याला जोडणार्या या सीमा तपासणी नाक्यावर काही अधिकारी हे प्रामाणिकपणे कार्य करीत आहेत. पण काही अधिकार्यांच्या मनमानीमुळे दररोज संपर्कात असणार्या शेतकरी, मजूर, विद्यार्थींना नाहक त्रास होत आहे. याबाबत आपण चिकोडी येथील वरिष्ठ पोलिसांना सुद्धा सांगितले आहे. त्यावेळी त्यांनी दररोज संपर्कात असलेल्यांना मुभा देणे बाबत सांगितले होते. तरी बेळगाव जिल्हा वरिष्ठ अधिकारी येथील सीमा तपासणी नाक्यावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. मुद्दामून प्रवाशांना त्रास देण्याचा प्रकार या ठिकाणी होत आहे. आपण शिरोळ तहसील कार्यालय व कुरुंदवाड पोलिसांना याबाबत निवेदन देऊन या ठिकाणी शिवसेना तालुका पदाधिकार्यांच्या वतीने आंदोलन छेडणार आहोत.
महाराष्ट्रमधील काही प्रवासी येथे काम करीत असलेल्या शिक्षकांवर धावून जाण्याचा प्रकार घडला. या वेळी शिक्षक, पोलिस, होमगार्ड यांनी आपण या ठिकाणी नोकरी कशी करायची असा प्रश्न केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या सीमा तपासणी नाक्यावर अधिक बंदोबस्त वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावेळी शिवसेना विभाग प्रमुख जयसिंग वडर, सुनील दुर्वे, सुरेश पाटील, सुधाकर घाटगे, अभिनंदन चव्हाण, अभिनंदन पाटील, राजगोंडा पाटील, राजू साळुंके, यांच्यासह शिरोळ तालुका शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अधिवेशनात आंदोलन
Spread the love राजू पोवार ; रयत संघटनेची गांधी भवनात बैठक निपाणी (वार्ता) : ओला …