
हनुमान जयंतीनिमित्त आयोजन : दिवसभर विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : गोंदिकुपी येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित जनरल बैलगाडी शर्यतीमध्ये रणजीत पाटील यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावून ५ हजार एक रुपये आणि निशान पटकाविले. त्या शर्यतीत नितीन पाटील आणि रोहित पाटील यांच्या गाड्यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ३ हजार रुपये व २ हजार रुपयांची बक्षिसे पटकावली.
घोडा-बैल गाडी शर्यतीमध्ये अनिल म्हैसुरे, दत्तात्रय जनाळे, गोटू मोरे त्यांच्या गाड्याने प्रथम ते तृतीय क्रमांकाची ३ हजार १ रुपये, २ हजार १ रुपये आणि १ हजार१ रुपयांची बक्षिसे पटकावली. जनरल घोडा गाडी शर्यत संदेश शिंदे, विनायक कापसे, बिंदू मोरे यांच्या गाड्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची ५ हजार १, ३ हजार १, २ हजार १ रुपयांची बक्षिसे पटकावली. नवतर घोडा- गाडी शर्यतीमध्ये संदेश शिंदे, शंकर भोसले, तानाजी पवार यांच्या गाड्यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची ३ हजार १, २ हजार १, आणि १ हजार १ रुपयांची बक्षिसे मिळवली. शर्यतीतील विजेत्यांना युवानेते उत्तम पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली यावेळी उत्तम पाटील यांनी हनुमानाचे दर्शन घेतले. दुपारी महाप्रसादाचे वाटप झाले.
यावेळी सुनील पाटील, दत्ता मोरे, मारुती पाटील, युवराज पाटील, नेताजी भोसले, महादेव पाटील, तानाजी पाटील, बाळू पाटील, संभाजी पाटील, संतोष पाटील, पांडुरंग पाटील अरविंद पाटील रघुनाथ पाटील, धनाजी मोरे, सुरेश कापसे, सदाशिव कापसे, ज्योतीराम पाटील, नागेश पाटील, गुंडा शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta