निपाणी (वार्ता) : येथील प्रगती नगरातील रहिवासी मनीषा सुनील शेवाळे यांना 25 डिसेंबर 2021 रोजी कर्नाटक राज्य ग्रामीण शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. सामाजिक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त जोल्ले उद्योग समूहातर्फे आयोजित ’भीमपर्व’ या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थित त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, खासदार अण्णासाहेब जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, जोतिप्रसाद जोल्ले, प्रा. डॉ. अच्युत माने, दलित क्रांती सेनेचे अध्यक्ष अशोककुमार असोदे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा निता बागडे, सभापती राजू गुंदेशा, हाल शुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, नगरसेवक संतोष सांगावकर, दत्ता जोत्रे, सद्दाम नगारजी नगरसेविका सुजाता कदम, उपासना गारवे, दिपाली गिरी, विजय मेत्रांणी, प्रणव मानवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Check Also
नांदणीत १ जानेवारीपासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक
Spread the love जिनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी : ९ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन निपाणी (वार्ता) …