
सौंदलगा : ग्रामपंचायतीकडून राबवल्या जाणाऱ्या जलनिर्मल योजनेच्या ठिकाणी सर्व साधारण दोन ते अडीच लाखांच्या साहित्याची चोरी. सौंदलगा ग्रामपंचायतीचे जलनिर्मल योजना राष्ट्रीय महामार्गाला लागून असुन त्यामध्ये असणाऱ्या साहित्याची चोरी करण्यात आली. यामध्ये पाण्याच्या साडेबारा एचपीचे एक मोटर, दहा एचपीचे दोन मोटर, याशिवाय कंपाउंडसाठी लागणाऱ्या तारेचे दोन बंडल, लोखंडी व्हॉल १३ नग, बीडच्या ३ दहा फुटी पाईप, जेसीबीचे बकेट एक आदी साहित्यांची चोरी झाली. असून सकाळी पहाटे पाच वाजता वाटरमॅन पाणी सोडण्यास गेला असता त्याच्या निदर्शनास आले की खोलीचे कुलूप तोडून पडले आहे. हे पाहिल्यानंतर त्याने ग्रामविकास अधिकारी अश्पाक शेख तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना माहिती दिली. त्यानी लगेच ग्रामपंचायतीच्या वतीने या चोरीचे नोंद निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्यात करून त्याचा पंचनामा केला.
Belgaum Varta Belgaum Varta