Sunday , July 26 2026
Breaking News

हिंडलगा ग्रा. पं. सदस्यांच्या विनंतीवरून दिले पत्र : आशा ऐहोळे

Spread the love


बेळगाव : हिंडलगा ग्राम पंचायतीच्या सदस्यांनी विकासकामांसाठी पत्र देण्याची विनंती केली होती. म्हणून मी पत्र दिले होते हे खरे. पण कंत्राटदार संतोष पाटील यांना मी कधीच प्रत्यक्ष भेटले नाही, अशी महत्वाची माहिती बेळगाव जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष आशा ऐहोळे यांनी दिली आहे. कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी बेळगावात गुरुवारी पत्रकारांशी बोलताना माजी जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे म्हणाल्या, 2020 मध्ये हिंडलगा गावच्या महालक्ष्मी देवीची यात्रा होती. त्या संदर्भात हिंडलगा ग्रा. पं.चे सदस्य मला भेटले होते. त्यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी पत्र देण्याची विनंती मला केली. त्यानुसार मी पत्र दिले. परंतु माझ्या पत्रावर नंतर काय कार्यवाही झाली हे मला माहित नाही. ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने कामांना मंजुरी दिल्याचे मला आजच समजले आहे. कंत्राटदार संतोष पाटील आणि माझी प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही. त्यांनी आत्महत्या केल्याचे मला प्रसारमाध्यमांमुळे कळले. संतोष पाटील यांनी हा मार्ग पत्करायचा नव्हता अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याने माझ्या पत्राला पोच दिल्याची पावतीही मला मिळालेली नाही. जि. पं. अधिकारी ती आपल्या कागदपत्रात संग्रही ठेवतात. कामांना मंजुरीसाठी हिंडलगा ग्रा.पं.चे सदस्य मला भेटले होते. मात्र कामे केल्याबद्दल त्यांनी मला कसलीच माहिती दिली नाही. माझ्या पत्रानंतर कामांना मंजुरी मिळायची पोच मला आजच मिळाली आहे. 17 फेब्रुवारी 2021 रोजी मंजुरी दिल्याचा उल्लेख त्यात आहे असे आशा ऐहोळे यांनी सांगितले.
संतोष पाटील यांना मी ओळखत नाही असे ईश्वरप्पा यांनी म्हटले आहे त्याबाबत तपासाधिकाऱ्यानी खोलवर तपास केला पाहिजे. मी दिलेल्या पत्राबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कितपत माहिती आहे हे मला माहित नाही, असेही आशा ऐहोळे यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *