Tuesday , March 3 2026
Breaking News

निपाणीत बसव जयंती उत्साहात

Spread the love


महादेव मंदिरात विविध कार्यक्रम : मान्यवरांची उपस्थिती
निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात मंगळवारी जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली त्यानिमित्त विविध मंडळातर्फे कुडलसंगम येथून बसव ज्योत आणण्यात आली होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बसव जयंती कार्यक्रमास उपस्थित राहून महात्मा बसवेश्वरांना अभिवादन केले.
येथील महादेव गल्ली येथील महादेव मंदिर मंदिर ट्रस्ट व समस्त लिंगायत समाजातर्फे जत्राटवेस येथील महात्मा बसवेश्वर यांच्या अर्धपुतळ्यास अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुडलसंगमहून बसव ज्योत आणण्यात आली होती. त्याचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यानंतर महादेव मंदिरात मान्यवरांच्या हस्ते शिवबसव पुतळ्याचे पूजन झाले. संजीवनी जाधव, सुनीता जाधव, साधना पाटील, कलावती जाधव, सुनंदा जाधव, मीनाक्षी वंटमुरे, स्वती गुरव, मीनाक्षी करंबळे व महिलांनी पाळणा सादर केला. त्यानंतर बोरगाव येथील युवा नेते उत्तम पाटील, बसव प्रसाद जोल्ले व मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. सुंठवडा वाटपाने बसव जयंतीची सांगता करण्यात आली.
त्यावेळी माजी आमदार काकासाहेब पाटील, माजी आमदार प्रा. सुभाष जोशी, हालशुगरचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, उत्तम पाटील, संचालक पप्पू पाटील, डॉ. चंद्रकांत कुरबेट्टी माजी उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नगराध्यक्ष जयवंत भाटले, उपनगराध्यक्षा निता बागडे, चंद्रकांत तारळे, श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर सरकार, संजय मोळवाडे, नगरसेवक विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार, अ‍ॅड. महेश दिवाण, दत्ता नाईक, दयानंद कोठीवाले, मल्लिकार्जुन गडकरी, रवींद्र चंद्रकुडे, महेश दुमाले, डॉ. महेश ऐनापुरे, वज्रकांत सदलगे, रोहित पाटील, बंडा जनपुरे, अमोल चंद्रकुडे, पुष्कर पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी अक्कोळ रोडवर ‘बर्निंग’ व्हॅनचा थरार

Spread the love  नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचले चालकाचे प्राण निपाणी (वार्ता) : भरधाव जाणाऱ्या मारुती व्हॅनने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *