
मान्यवरांची उपस्थिती : संभाजी राजे चौकात कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त शुक्रवारी (ता.६) येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात अभिवादन करण्यात आले. प्रारंभी माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी व मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. यावेळी १०० सेकंद स्तब्धता पाळून महाराजांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास चिकोडी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, नगराध्यक्ष जयवंत भाटले, निपाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, रोहन साळवे, माजी नगराध्यक्ष विजय शेटके, निकु पाटील, अशोककुमार असोदे, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, रवींद्र शिंदे, संतोष सांगावकर, शौकत मनेर, नवनाथ चव्हाण, माजी सभापती अल्लाबक्ष बागवान, दिलीप चव्हाण, किरण कोकरे, अशोक लाखे, सचिन हेगडे, युवराज पोळ, अस्लम शिकलगार, वचन सुतार, अरुण आवळेकर, अशोक खांडेकर, बबन घाटगे, सचिन पोवार, दीपक सावंत, सुनील हिरुगडे, इंद्रजीत जामदार, राजन चिकोडे, ओंकार शिंदे, भालचंद्र पारळे, काशीमखान पठाण, बाळासाहेब कमते, नगरसेविका सोनाली उपाध्ये यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta