Sunday , July 26 2026
Breaking News

राजर्षी शाहू महाराजाना सांबऱ्यात अभिवादन!

Spread the love

बेळगाव : लाल मातीच्या कुस्तीला प्रोत्साहन देणारे लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त सांबरा कुस्ती कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करण्यात आले.
साई जिमच्या आवारात राजर्षी छ. शाहू महाराज अभिवादान करण्यात आले. राजर्षी शाहू महाराजांनी लाल मातीच्या कुस्तीला राजाश्रय दिला. तालीम आणि आखाडे बांधले. तसेच मल्लांना प्रोत्साहन देवून कुस्तीला बळकटी दिली, अशा शब्दांत छ. शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी यल्लाप्पा हरजी, लक्ष्मण सुळेभावी, भरमा चिंगळी, कृष्णा जोई, मोहन हरजी, शिवाजी मालाई, भुजंग धर्मोजी, यल्लाप्पा जोगानी, सिद्राई जाधव, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, शितलकुमार तिप्पान्नाचे, महेंद्र गोठे, नितिन चिंगळी, प्रवीण ताडे, अनिल कडेमनी, विनायक चिंगळी, अप्पानी यड्डी, मोहन शंकर हरजी, कल्लाप्पा चिंगळी, ओमकार चौगले, प्रकाश खनगावकर, रोहित चिंगळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *